शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही पिण्याला, अन् ग्रामपंचायत कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

नागरी सुविधा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे म्हणत समस्या मांडण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. ...

नागरी सुविधा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे म्हणत समस्या मांडण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, तिथे सरपंच, उपसरपंच अथवा ग्रामविकास अधिकारी नसल्याने पाणी नाही पिण्याला अन् ग्रामपंचायत कशाला, असा सवाल व्यक्त केला.

चाकूर तालुक्यातील चापोली ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गतच्या शंकरवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी १२ महिने भटकंती करावी लागते. सध्या उन्हाळ्यात तर पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या नाहीत. विद्युत पथदिवे नाहीत यासह अन्य मूलभूत समस्या आहेत. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. घरकुल व विहीर योजनेसाठी दुर्लक्ष केले जाते. गावामध्ये स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. गटारी तुंबल्या आहेत. साफसफाई करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दक्षता घेतली जात नाही.

सध्या येथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात नाही. येथील नागरी समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप केला. ग्रामपंचायतीने नागरी सुविधा व अडचणी न सोडविल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला. यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्यावर महानंदा कासले, छाया पस्तापुरे, कांताबाई कांबळे, पार्वती चिमले, लक्ष्मीबाई कांबळे, सखुबाई चिमले, वंदना रामासाने, सुमन चिमले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लवकर समस्या सोडविल्या जातील...

शंकरवाडी येथील महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह अन्य नागरी सुविधांबाबत निवेदन दिले आहेत. लवकर त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह अन्य अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ग्रामविकास अधिकारी हणमंत मुरुडकर यांनी सांगितले.