शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
4
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
5
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
6
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
7
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
8
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
9
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
10
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
11
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
12
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
13
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
14
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
15
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
16
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
17
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
18
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
19
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
20
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST

३१२ हेक्टरवर झाली फळबागांची लागवड लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

३१२ हेक्टरवर झाली फळबागांची लागवड

लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ४२४ शेतकऱ्यांनी ३१३ हेक्टरवर फळबागांची लागवड केली आहे. यामध्ये आंबा, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्री, सीताफळ, लिंबू, आदी फळांचा समावेश आहे. दरम्यान, या योजनेबाबत कृषी विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. फळबाग लागवड योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात अँटी कोरोना फोर्सचा पहारा

लातूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अँटी कोरोना फोर्स तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. औसा, निलंगा, देवणी, जळकोट, आदी ठिकाणी स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी अँटी कोरोना फोर्समध्ये सहभागी झाले आहेत. या माध्यमातून गावाच्या प्रवेशद्वारावर खडा पहारा दिला जात असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगबाबत जनजागृती केली जात आहे.

जिल्हाभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. घरोघरी हनुमान जयंतीनिमित्त पूजन करण्यात आले. तसेच अनेकांनी हनुमान चालिसाचे पठणकेले. कोरोनामुळे अनेकांनी घरच्या घरीच जयंती साजरी करण्याला प्राधान्य दिले. ग्रामीण भागातही नियमांचे पालन करीत हनुमान जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या वर्षी जयंतीनिमित्त होणाऱ्या कुस्ती स्पर्धा झाल्या नाहीत.

मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त

लातूर : शहरातील अनेक भागांत मोकाट श्वानांचा संचार वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मोकाट श्वानांमुळे गल्लोगल्लीत भीतीचे वातावरण आहे. याकडे शहर महापालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीच्या मागे श्वान लागत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून महापालिकेकडे होत आहे.

रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी

लातूर : लातूर तालुक्यातील जेवळी ते लातूर तसेच हरंगुळ (बु.) या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. रस्तादुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लिंगायत महासंघाच्या वतीने सामाजिक उपक्रम

लातूर : लिंगायत महासंघाच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांसाठी मदत केली जात असल्याची माहिती प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांनी दिली. रुग्णांना बेड मिळणे, औषधासाठी मदत, नातेवाइकांसाठी भोजनाचे डबे, अंत्यविधीसाठी मदत, आदी उपक्रम लिंगायत महासंघाच्या वतीने राबविले जात आहेत. यासाठी जिल्हाध्यक्ष प्रा. काशिनाथ राजे, माणिक कोकणे, विश्वनाथ स्वामी, विजयकुमार कुडंबले, शिवाजी मुळे, दयानंद मठपती, शिवाजी भातमोडे, शंकरे गुरुजी, करिबसवेश्वर पाटील, विश्वनाथ मिटकरी, सिद्राम पोपडे, चंद्रकांत काला-पाटील परिश्रम घेत आहेत.

लातूर तालुक्यात कोरोना नियंत्रण आढावा बैठक

लातूर : लातूर तालुक्यातील गंगापूर, वासनगाव, सावरगाव, एकुर्गा, निवळी या गावांमध्ये उपविभागीय अधिकारी सुनील यादव व तहसीलदार स्वप्निल पवार यांनी भेटी देऊन सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्या बैठका घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन केले. कोरोना रुग्ण तसेच होम आयसोलेशनमधील रुग्णांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी शाम गोडभरले, तालुका आरोग्याधिकारी डाॅ. अशोक सारडा, मंडळ अधिकारी संजय घाडगे, आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.