चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 19:31 IST2021-06-23T19:31:23+5:302021-06-23T19:31:58+5:30
चारित्र्याच्या संशयावरून राहत्या घरातच पत्नीचा गळा दाबून खून केला.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून
किल्लारी (जि. लातूर) : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना औसा तालुक्यातील लामजना येथे उघडकीस आली आहे. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आराेपी पतीच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
प्रारंभी याप्रकरणी किल्लारी पाेलीस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती. मात्र, काही संशयास्पद बाबी पाेलिसांच्या नजरेला आल्याने, अधिक खाेलात जात तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. अखेर या घटनेतील आराेपी हा विवाहितेचा पतीच निघाला. याप्रकरणी आरोपी पती उमेश बाबू सरवदे याला किल्लारी पाेलिसांनी ताब्यात घेतले. पाेलिसीखाक्या दाखविताच उमेश सरवदे याने पत्नीचा खून आपणच केल्याचे कबूल केले. चारित्र्याच्या संशयावरून राहत्या घरातच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून घराबाहेर पडलाे, अशी माहिती आराेपी पतीने दिली आहे. याबाबत मृत विवाहितेचा भाऊ सुरेश नागू कांबळे यांच्या फिर्यादीवरून किल्लारी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत.