नैतिक मूल्य, चारित्र्यसंपन्न युवक राष्ट्राची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:32+5:302021-09-07T04:25:32+5:30

उदगीर : नैतिक मूल्य व चारित्र्यसंपन्न अधिष्ठान असलेले युवक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे, असे मत जिल्हा न्यायाधीश पी. ...

Moral values, the wealth of a youthful nation with character | नैतिक मूल्य, चारित्र्यसंपन्न युवक राष्ट्राची संपत्ती

नैतिक मूल्य, चारित्र्यसंपन्न युवक राष्ट्राची संपत्ती

उदगीर : नैतिक मूल्य व चारित्र्यसंपन्न अधिष्ठान असलेले युवक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे, असे मत जिल्हा न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी व्यक्त केले.

तालुका विधी सेवा समिती व मातृभूमी महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय युवा दिन व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी न्या. व्ही. बी. दिवाकर, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, ॲड. महेश मळगे आदी उपस्थित होते.

यावेळी न्या. सुभेदार म्हणाले, महाविद्यालयीन तरुणांनी मोबाईलचा वापर योग्य कामासाठी करावा. सायबर क्राईम होणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन आपले आई-वडील व समाजाचे नाव मोठे करावे, असे आवाहन केले. न्या. व्ही. बी. दिवाकर यांनी रस्ते वाहतूक नियंत्रण कायदे व वाहनांची कागदपत्रे, वेगमर्यादा, वाहतुकीचे नियम, वाहनाचा विमा याविषयी मार्गदर्शन केले.

ॲड. महेश मळगे यांनी पर्यावरण संरक्षण, सुरक्षित अन्नधान्य, रसायन व भेसळयुक्त अन्नधान्य यासह मानव रक्षण, कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ॲड. भास्कर बोळे यांनी केले. प्रा. रणजित मोरे यांनी आभार मानले. या शिबिरासाठी वकील संघाचे सचिव ॲड. भास्कर बोळे, मातृभूमीच्या प्राचार्य उषा कुलकर्णी, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा. सय्यद वस्ताद, प्रा. रेखा रणक्षेत्रे, प्रा. फुलनदेवी किवंडे, प्रा. नरसीकर, प्रा. धोंडिराम जोशी आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Moral values, the wealth of a youthful nation with character