मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 18:56 IST2020-10-09T18:55:53+5:302020-10-09T18:56:23+5:30
भररस्त्यावर मारहाण करुन मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले मोबाईल काही दुचाकी जप्त केली आहे.

मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या
लातूर : भररस्त्यावर मारहाण करुन मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले मोबाईल काही दुचाकी जप्त केली आहे.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी शहरातील बार्शी महामार्गावरील एका बारच्या पाठीमागे मोटारसायकलवर काही व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना मिळाली. गुरुवारी दु. २.३० च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला. काळी वेळात एका दुचाकीवरून (एम.एच. २४ एच. ००९५) मनोज नागनाथ कसबे (२९ रा. माउलीनगर, लातूर), ऋषीकेश शंकरराव कासले (२२ रा. हरंगुळ ता. लातूर) आणि रोहित शिवराज लखादिवे (१९ रा. पाखरसांगवी ता. लातूर) असे तिघे जण आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता मनोजच्या खिशात चोरलेला एक मोबाईल सापडला.
पोलिसी खाक्या दाखविल्यावर मनोज कसबे याने ऋषीकेश आणि रोहित यांच्यासह एमआयडीसीतील ऑईलमिलजवळ एका व्यक्तीला मारहाण करुन तो मोबाईल चोरला असल्याचे कबुल केले. पोलीस निरीक्षक भालेराव, पोहेकॉ. टेकाळे, धारेकर, प्रकाश भोसले यांनी सदरील कारवाई केली.