शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे चाकूरमध्ये हल्लाबोल आंदोलन ! आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांनासोबत घेत समस्यांचा पंचनामा करून घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:13 IST

MNS's Hallabol agitation शहरातील रस्त्याचे निकृष्ट काम, दुषित पाणी पुरवठा, तुंबलेल्या गटारी अशा समस्या आंदोलकांनी आक्रमकतेने मांडल्या.

ठळक मुद्देशहरातील समस्यांबाबत मनसेचे हल्लाबोल आंदोलन दुषित पाणी, निकृष्ट रस्त्याचा मुख्याध्याकाऱ्यांनी केला पंचनामा 

चाकूर : शहरातील तुंबलेल्या गटारी, दूषित पाणी पुरवठा, रस्त्यावरील पेव्हरब्लॉकचे निकृष्ट काम या विरोधात मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. प्रभारी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना जाब विचारत आंदोलकांनी त्यांना समस्यांचा स्पॉट पंचनामा करण्यास भाग पाडले. यावेळी शहरातील अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

शहरातील रस्त्याचे निकृष्ट काम, दुषित पाणी पुरवठा, तुंबलेल्या गटारी अशा समस्या आंदोलकांनी आक्रमकतेने मांडल्या. आंदोलकांनी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांसोबत घेऊन समस्यांचा पंचनामा करण्यास भाग पाडले. शहरातील पेट्रोलपंपाजवळ पाईपलाईनमधून पाण्याचे फवारे उडतात. तिथेच गटाराचे पाणी तुंबलेले आहे. याच दुषित पाण्याचा शहराला पुरवठा होतो. याचा प्रभारी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडून प्रथम स्पॉट पंचनामा करून घेण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरील पेव्हारब्लॉकच्या कामाचा निकृष्ट दर्जा मुख्याधिकारी शिंदे यांना दाखवून पंचनामा करण्यात आला. तसेच पिण्याच्या पाण्याच्या मुख्य टाकीवर जाऊन तेथील अस्वछतेचा देखील मुख्याधिकाऱ्यांनी पंचनामा केला. निकृष्ट कामे करणाऱ्या सबंधित सर्वांवर कारवाईची हमी दिल्यानंतर मनसेने हल्लाबोल आंदोलन थांबवले. आंदोलनात शहराध्यक्ष अजय धनेश्वर, कृषि तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, अजित घंटेवाड, अॅड ओंकार शेटे, महिला तालुकाध्यक्षा सरस्वती नवरखेले, राम कसबे, दत्ता सूर्यवंशी, तुळशीदास माने, विठ्ठल प्रसाद झांबरे, गणेश चौहान,कृष्णा गिरी,सुरज लोंढे आदींचा सहभाग होता.

कर कशासाठी भरायचानगरपंचायतीला पाच वर्षात तीन मुख्याधिकारी लाभले. परंतु, एकही मुख्यालयी राहत नसल्याने त्यांना समस्यांची जाण नाही. मुख्याधिकाऱ्यांनी प्रथम मुख्यालयी राहवे, दर्जेदार रस्ते, निर्जंतुक पाणी व गटारांची स्वच्छता हे प्राधान्याने करावे. सर्व नागरिकांचा तो हक्क आहे. कर भरूनही निकृष्ट रस्ते, तुंबलेल्या गटारी व दूषित पाणी मिळत असेल तर नगरपंचायतचे कार्य काय ?असा सवाल जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केला. यानंतरही प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :MNSमनसेlaturलातूर