शेतकऱ्यांच्या विकासात बाजार समितीचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST2021-04-14T04:17:56+5:302021-04-14T04:17:56+5:30
सोमनाथपूर येथील बाजार समितीच्या जागेत शेतकऱ्यांचा शेतमाल साठविण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या ५ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाच्या भूमिपूजन समारंभात ...

शेतकऱ्यांच्या विकासात बाजार समितीचे मोठे योगदान
सोमनाथपूर येथील बाजार समितीच्या जागेत शेतकऱ्यांचा शेतमाल साठविण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या ५ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाच्या भूमिपूजन समारंभात ते मंगळवारी बोलत होते. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, तालुका काँग्रेस अध्यक्ष कल्याण पाटील, लक्ष्मीताई भोसले, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, शहराध्यक्ष मंजूरखाँ पठाण, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, बाजार समितीचे संचालक सुभाष धनुरे, पद्माकर उगिले, रमेश पाटील तपशाळकर, संतोष बिरादार, कैलास पाटील, गौतम पिंपरे, अनिल लांजे, धनाजी जाधव, संजय पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, अहमद सरवर, विजयकुमार चवळे, शशिकांत बनसोडे, महेश स्वामी, संजय पाटील तोगरीकर, रमेश पाटील तोगरीकर, कुणाल बागबंदे, अडत असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी घोगरे, बाजार समितीचे प्रभारी सचिव आदी उपस्थित होते.
यावेळी निटुरे म्हणाले, उदगीर बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेपर्यंत मोफत शेतमाल साठविण्यासाठी गोदामाची गरज लक्षात घेऊन हे काम सुरू केले आहे. राज्याच्या योजनेसह केंद्र सरकारच्याही काही चांगल्या योजना आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी केले. आभार डी.एम. माने यांनी मानले. यशस्वीतेसाठी हबीब दुरानी, सतीश पाटील, भगवान मांजरे यांच्यासह बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.