शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे बँकेत खाते उघडण्यास पालकांचा अल्प प्रतिसाद; योजनांचा लाभ मिळण्यास होणार अडचण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

या योजनांच्या लाभासाठी खाते आवश्यक... उन्हाळी सुटीतील पोषण आहाराचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. शिष्यवृत्ती, तसेच इतर याेजनांचे ...

या योजनांच्या लाभासाठी खाते आवश्यक...

उन्हाळी सुटीतील पोषण आहाराचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत.

शिष्यवृत्ती, तसेच इतर याेजनांचे पैसे जमा करण्यास बँकेत खाते गरजेचे असते.

जिल्ह्यात खाते उघडण्यास विद्यार्थी पालकांचा अल्प प्रतिसाद आहे.

जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्थिती

जि.प. शाळा - १२८०

विद्यार्थी संख्या - १,७०,५६३

शिक्षण विभागाकडे आकडेवारीच नाही...

जिल्ह्यात प्राथमिकच्या १२८० जि.प. शाळा आहेत. यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या पावनेदोन लाखांच्या वर आहे. सर्वच विद्यार्थ्यांना खाते उघडण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, पुरेशी जनजागृती आणि समन्वयाचा अभाव असल्याने आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी खाते उघडले याची माहितीच शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे खाते कधी उघडणार, यादी कधी पाठविणार आणि प्रत्यक्ष पैसे खात्यावर कधी जमा होणार हा प्रश्न आहे.

कागपत्रांसाठी पालकांची होतेय धावपळ...

पोषण आहाराचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी बँकेचे खाते आवश्यक आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे खाते नसल्याने बँकेत खाते उघडण्यासाठी पालकांची धावपळ होत आहे. कागपत्रांची जमवाजमव केली जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी बँकांमध्ये गर्दी होत आहे.

पालकांना येणाऱ्या अडचणी काय...

खाते उघडण्यासाठी कागदपत्रे काढण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागत आहे.

कोरोनामुळे बँकेत नियमांचे पालन करीत खाते उघडण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहेे.

शाळांच्या वतीने खाते क्रमांक लवकर द्या, म्हणून विद्यार्थ्यांकडे तगादा सुरू आहे. त्यामुळे लवकर खाते उघडण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे.