शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात भाजप, काँग्रेसची लढाई अटीतटीची; मतदारसंघांवरील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:38 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील ५९ गटांत आणि ११८ गणांत चुरस वाढली आहे.

- हरी मोकाशेलातूर : जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामात अवघे काही तास शिल्लक असताना सहाही विधानसभा मतदारसंघातील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे. प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लढाई अटीतटीची होत असून, एकमेकांवर शाब्दिक प्रहार जोरदार सुरू आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील ५९ गटांत आणि ११८ गणांत चुरस वाढली आहे. स्थानिक नेत्यांबरोबर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्याने राजकीय वातावरण आणखीन तापले आहे. निलंगा, औसा, देवणी, शिरूर अनंतपाळ, लातूर, रेणापुरात भाजप आणि काँग्रेस नेतेमंडळींकडून शाब्दिक हल्ले चढविले जात आहेत. विरोधक तेवढ्याच प्रभावीपणे प्रतिहल्ले करीत आहेत.

मतदारसंघावरील प्रभुत्वासाठी कसोटीभाजपचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील - निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघावर, आ. अभिमन्यू पवार यांनी औसा, आ. रमेश कराड यांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघावरील पकड कमी होऊ नये म्हणून सर्व शक्ती पणाला लावली आहे.राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते तथा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे अहमदपूर - चाकूर, तर माजी मंत्री आ. संजय बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

काँग्रेसची लढाई एकहातीकाँग्रेसचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील गट, गणांबरोबर जिल्ह्यात काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. विशेषत: जिल्ह्यात काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. ते स्वबळावर किल्ला लढवीत आहेत.

टीकेची धार वाढलीकाँग्रेस पायाभूत सुविधा, शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरणाबरोबर भाजपवर टीकेचे घाव घालत आहे. भाजपनेही केंद्र, राज्यातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगत ‘हाता’चा वार चुकवत प्रतिहल्ला करीत आहेत. निलंगा, औसा, लातूर तालुक्यात जिव्हारी लागणाऱ्या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण आणखीन तंग झाले आहे. महायुती व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची समीकरणे काही गटांत जुळली आहेत. काही ठिकाणी मैत्रिपूर्ण सामने होत आहेत. त्यावर विजयाची गणिते राहणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tight BJP-Congress Fight in Latur: Challenge to Retain Constituency Dominance

Web Summary : With district council elections nearing, a fierce BJP-Congress battle unfolds in Latur. Leaders strive to maintain control over constituencies. Accusations fly as parties focus on development and welfare, creating a tense political atmosphere with strategic alliances forming across the district.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६laturलातूरBJPभाजपाcongressकाँग्रेस