शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्हा परिषद सभापती निवड: माने, गोडभरले, बिरादार, गोरे यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:52 IST

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील चार सभापतींच्या निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतिपदी राष्ट्रवादी (अजित पवार)चे उत्तम माने, महिला व बालकल्याण सभापतिपदी भाजपच्या शिवकन्या गोडभरले यांची तर उर्वरित दोन विषय समिती सभापतिपदी राष्ट्रवादी (अजित पवार)चे ज्ञानेश्वर बिरादार आणि भाजपच्या कविता गोरे यांची सोमवारी दुपारी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर फटाके फोडून, गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील चार सभापतींच्या निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजकल्याण सभापतिपदासाठी महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार)चे शिरूर ताजबंदचे उत्तम माने यांनी तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे लोहारा गटातील मुकेश भालेराव यांनी उमेदवारी दाखल केली होती. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी महायुतीतील भाजपच्या खरोळा गटातील शिवकन्या गाेडभरले यांनी तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या औराद शहाजानी गटातील योगिता जाधव यांनी अर्ज दाखल केला होता.

उर्वरित दोनपैकी एका विषय समिती सभापतिपदासाठी महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार)चे तोगरी गटातील ज्ञानेश्वर बिरादार यांनी तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे एकुर्गा गटातील दत्तात्रय टेकाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दुसऱ्या विषय समिती सभापतिपदासाठी महायुतीतील भाजपच्या सरवडी गटातील कविता गोरे यांनी तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे खरोसा गटातील तानाजी जाधव यांनी उमेदवारी दाखल केली होती. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज मागे...सर्व नामनिर्देशनपत्र छाननी वैध ठरले. उमेदवारी मागे घेण्याच्या वेळेत काँग्रेसच्या चारही इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे चारही सभापतींच्या बिनविरोध निवडी झाल्याचे पीठासन अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी जाहीर केले. त्यांना तहसीलदार सौदागर तांदळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, गटविकास अधिकारी संतोष माने यांनी साहाय्य केले.

नूतन पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाने केले स्वागत...नूतन सभापती माने, गोडभरले, बिरादार आाणि गोरे यांचे पीठासन अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी यांची उपस्थिती होती.

सर्व मतदारसंघांना दिली सत्तेची संधी...जिल्हा परिषद अध्यक्षपद हे निलंगा तर उपाध्यक्षपद हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाकडे देण्यात आले. आता सभापती निवडीत अहमदपूर, उदगीर, लातूर ग्रामीण, औसा मतदारसंघास प्राधान्य देण्यात आले आहे. सभापतिपदाच्या माध्यमातून समतोल राखण्याचा प्रयत्न नेतेमंडळींनी केला आहे.

संजय बनसोडे यांनी केले स्वागत...नूतन सभापतींचा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी जिल्हा परिषदेत सत्कार करून स्वागत केले. लोकाभिमुख कार्य करून लौकिक वाढवावा, असा सल्लाही दिला.

बिरादार यांना बांधकाम, गोरे यांना कृषी सभापतिपद?...जिल्हा परिषदेतील बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतींच्या दालनात राष्ट्रवादी (अजित पवार)चे नूतन सभापती ज्ञानेश्वर बिरादार यांचा तर कृषी व पशुसंवर्धन सभापतींच्या दालनात भाजपच्या कविता गाेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे बांधकाम सभापतिपदी बिरादार आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी गाेरे यांची आजच निवड झाली की काय? असा सवाल उपस्थित होत होता.

नियमानुसार आगामी सर्वसाधारण सभेत बांधकाम, कृषी व पशुसंवर्धनसह अन्य खाते वाटप वाटप होणार आहे.-उषाबाई पाटील, अध्यक्ष

नेतेमंडळींच्या धोरणानुसार बिरादार यांचा बांधकाम तर गोरे यांचा कृषी खात्याच्या कक्षात सत्कार होत आहे.रामचंद्र तिरुके, गटनेते, भाजप

पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार बांधकाम सभापतिपद बिरादार यांना संधी देण्यात आली आहे.-प्रा. दिलीपकुमार मटके, गटनेते, राष्ट्रवादी (अजित पवार).

पीठासन अधिकाऱ्यांचा मोबाइल गायब...पीठासन अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांचा निवडी प्रक्रियेदरम्यान सभागृहातून मोबाइल गायब झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Zilla Parishad: Mane, Godbharle, Biradar, Gore elected unopposed as chairpersons.

Web Summary : Mane, Godbharle, Biradar, and Gore were elected unopposed as chairpersons of Latur Zilla Parishad committees. Celebrations followed the unopposed elections. Congress candidates withdrew nominations, ensuring unopposed selections. The new officials were welcomed.
टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद