Latur: धक्कादायक! साेशल मीडियात फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, लातुरातील घटना, साेलापूरच्या युवकाला अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: June 18, 2023 17:00 IST2023-06-18T16:59:39+5:302023-06-18T17:00:28+5:30
Crime News: काढलेले फाेटाे साशेल मीडियात व्हायरल करताे, म्हणून ब्लॅकमेल करत एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur: धक्कादायक! साेशल मीडियात फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, लातुरातील घटना, साेलापूरच्या युवकाला अटक
- राजकुमार जाेंधळे
लातूर - काढलेले फाेटाे साशेल मीडियात व्हायरल करताे, म्हणून ब्लॅकमेल करत एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आराेपीला शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले, लातुरातील एका वसतिगृहात पीडित मुलगी वास्तव्याला हाेती. दरम्यान, साेलापूर येथील इब्राहिम सादीक लाेहारे (वय १९) याने जुन्या ओळखीच्या आधारे मुलीशी जवळीकता साधली. एप्रिल २०२३ मध्ये त्याने परिचय झाल्यानंतर विविध प्रलाेभणे दाखविली. आराेपीही लातुरात वास्तव्याला असल्याने त्याने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला. यावेळी त्याने तिचे फाेटाे काढले आणि नंतर तिला ते फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल करताे, अशी धमकी दिली. या माध्यमातून त्याने पीडित मुलीला ब्लॅकमेल करण्याला सुरुवात केली. अखेर हतबल झालेल्या मुलीवर आराेपी इब्राहिम लाेहारे याने एप्रिल ते जून २०२३ या काळात अनेकदा तिच्यावर अत्याचार केला.
याबाबत धाडस करत पीडित मुलीने शिवाजीनगर पाेलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इब्राहिम सादिक लाेहारे यांच्याविराेधात गुरनं. २७२ / २०२३ कलम ३७६, ३५४, अ, ब, ड, आयटी ॲक्ट ६६ ई, ६७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपीला पाेलिसांनी अटक केली असून, त्याला तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.