लातूर हादरलं! संशयावरून ३२ विद्यार्थ्यांना काठीने झोडपलं; 'त्या' शिक्षकाविरुद्ध प्राचार्यांचीच तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:13 IST2026-02-24T13:10:19+5:302026-02-24T13:13:11+5:30

विद्यार्थ्यांवर संशय घेतला आणि बेदम मारहाण केली; अहमदपूर पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या

Latur School Shock: 32 Hostel Students Brutally Beaten by Teacher; Accused Arrested in Ahmedpur | लातूर हादरलं! संशयावरून ३२ विद्यार्थ्यांना काठीने झोडपलं; 'त्या' शिक्षकाविरुद्ध प्राचार्यांचीच तक्रार

लातूर हादरलं! संशयावरून ३२ विद्यार्थ्यांना काठीने झोडपलं; 'त्या' शिक्षकाविरुद्ध प्राचार्यांचीच तक्रार

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील थोरलेवाडी येथील एका स्कूलच्या वसतिगृहातील ३० ते ३२ विद्यार्थ्यांना शिक्षकाने वेळूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्राचार्यांच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील थोरलेवाडी येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहातील शिक्षक उज्ज्वल प्रकाश सोनी (रा. जवाहर वाॅर्ड, साई मंदिरजवळ बैतुल बाजार बैतुल, मध्य प्रदेश) यांना विद्यार्थ्यांनी आपल्या मोटारसायकलचे नुकसान केल्याचा संशय होता. त्यावरून त्यांनी २१ फेब्रुवारीला रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शाळेच्या वसतिगृहातील ३० ते ३२ विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत वेळूच्या काठीने अमानुष मारहाण केली. तसेच मी या शाळेचा प्राचार्य होणार आहे. तेव्हा तुम्हाला बघून घेतो, अशी धमकीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

शाळेचे प्राचार्य जैबाबेरला प्रपीन नाडर यांनी तत्काळ अहमदपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी उज्ज्वल सोनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्मिता जाधव हे करीत आहेत. शाळा विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आम्हीच शिक्षकावर कारवाई केली

मी स्वत: शाळेचा प्राचार्या म्हणून संबंधित शिक्षक उज्ज्वल सोनी यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. यापुढेही विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या जैबाबेरला नाडर यांनी सांगितले.

Web Title : लातूर में हंगामा: शिक्षक ने 32 छात्रों को पीटा; प्रिंसिपल ने शिकायत दर्ज कराई।

Web Summary : लातूर में एक शिक्षक ने छात्रों पर मोटरसाइकिल को नुकसान पहुंचाने का संदेह होने पर 32 छात्रों को बेरहमी से पीटा। स्कूल के प्रिंसिपल ने पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद शिक्षक को गिरफ्तार कर लिया गया। जांच जारी है; स्कूल ने छात्रों की सुरक्षा का आश्वासन दिया।

Web Title : Latur Shaken: Teacher beats 32 students; Principal files complaint.

Web Summary : A teacher in Latur, suspecting students damaged his motorcycle, brutally beat 32 students with a stick. The school principal filed a police complaint leading to the teacher's arrest. An investigation is underway; the school assures student safety.