लातूर रोड स्थानकावर रेल्वे डब्यातील साखर चोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:39 IST2019-01-16T17:38:59+5:302019-01-16T17:39:37+5:30

टेम्पो चालकास अटक करण्यात आली तर चोर पसार झाला़

On the Latur road station, the excavation of sugar from railway revealed | लातूर रोड स्थानकावर रेल्वे डब्यातील साखर चोरी उघडकीस

लातूर रोड स्थानकावर रेल्वे डब्यातील साखर चोरी उघडकीस

चाकूर (जि़ लातूर): तालुक्यातील लातूररोड येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मालवाहतूक रेल्वे गाडीच्या डब्यातील साखर चोरुन टेंम्पोमध्ये भरत असताना रेल्वे पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री छापा टाकला. रेल्वे पोलिसांनी टेम्पोसह साखर जप्त केली. टेम्पो चालकास अटक करण्यात आली तर चोर पसार झाला़

लातूररोड रेल्वे स्थानकातून माल वाहतूक करणाऱ्या मालगाड्या धावतात. कोल्हापूरहून साखर भरुन आसाम राज्यातील उदकन येथे जाणारी रेल्वेगाडी लातूररोड रेल्वे स्थानकात रात्री १ वा़ च्या सुमारास आली. प्लॉट फार्म १ वर ती थांबली असता, रेल्वेच्या डब्यातून साखर काढून ती टेंम्पो (एमएच १३, एझेड १६९४) मध्ये भरताना रेल्वे पोलिस एस़बी़ हाके यांना आढळले़ त्यांनी तो टेम्पो पकडला. पोलिसांची चाहूल लागताच चोरटा पसार झाला़ रेल्वे पोलिसांनी टेम्पोमधील चार क्विंटल साखर आणि टेंम्पो जप्त केला. 

स्टेशन मास्तर देवेंद्र यांनी या घटनेची माहिती सिकंदराबाद येथील रेल्वेच्या कंट्रोल रुमला दिली. त्यानंतर परळी (वैजनाथ) येथून रेल्वेचे पोलीस निरीक्षक श्रीराम मिना यांनी घटनास्थळी येथे येऊन पंचनामा केला.

Web Title: On the Latur road station, the excavation of sugar from railway revealed