शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महापालिकेत अमित देशमुख यांचा करिश्मा! काँग्रेस-वंचित आघाडीची ऐतिहासिक मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:32 IST

Latur Municipal Election Results 2026:मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील लातूर शहरात दिग्गज मानल्या जाणाऱ्या काही नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.

- हणमंत गायकवाडलातूर: विधानसभा निवडणुकीची जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलवून टाकत माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून नेतृत्वाचा करिष्मा पुन्हा एकदा दाखवून दिला. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील लातूर शहरात दिग्गज मानल्या जाणाऱ्या काही नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. विरोधी बाकावरून सत्तापक्षात उडी घेत उमेदवारीही मिळवली. ही काँग्रेसला लागलेली गळती अशी टीका होत असताना अमित देशमुख मात्र शांतपणे जाणाऱ्यांना शुभेच्छा देत होते. त्यानंतर प्रत्यक्ष रणधूमाळीत  प्रचाराचे काटेकोर नियोजन करीत शहर पिंजून काढले. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला ते ग्राऊंडवर उतरल्याचे दिसले. या प्रवासात त्यांना वंचित बहुजन आघाडीची निर्णायक साथ मिळाली

चुरशीच्या लढतीत काँग्रेस जिंकलीलातूर शहर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आ. अमित देशमुख हे कमी फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे अलर्ट झालेली काँग्रेस मनपाच्या रणसंग्रामात पहिल्या दिवसापासून आक्रमक होती. गाजलेली भाषणे, आक्रमक प्रचार, सभांची गर्दी असे वातावरण काँग्रेसला टिकवता आले. भाजपनेही मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांच्या सभांनी प्रचार ढवळून काढला.माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर या सर्वानीच काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.

रवींद्र चव्हाणांच्या विधानाने पीछेहाट !लातूर महापालिकेत 'झिरो ते हिरो' असे यश संपादन करणारी भाजप २०२६ च्या निवडणुकीत मात्र मागे पडली. मात्र भाजपाच्या नेत्यांनी एकत्र मोट बांधून जोरदार टक्कर दिली. त्यांच्या लढाईत आत्मविश्वास होता. प्रचारही जोरदार सुरू होता. परंतु, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका विधानाने वारे फिरले. विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याची भाषा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनाही रुचली नाही.

काँग्रेसच्या विजयाची, भाजपच्या पराभवाची कारणेकाँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र. काँग्रेसकडे अल्पसंख्याक मतांचे पाठबळ.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आठवण पुसल्या जातील हे वक्तव्य.काँग्रेस नेतृत्वाचा संयम, बंद मागे घेण्याचे आवाहन.अमित देशमुख यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न.भाजपमधील कुरबुरी, स्थानिक भाजपकडे ना मंत्रिपद ना पालकमंत्री पद. सगळे बाहेरून येणार, असा काँग्रेसचा प्रचार.

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Deshmukh's charisma: Congress-VBA alliance wins Latur Municipal Corporation.

Web Summary : Amit Deshmukh's leadership led Congress-VBA to a historic victory in Latur, dealing a blow to BJP. Chavan's controversial statement and internal BJP conflicts aided Congress.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Amit Deshmukhअमित देशमुखcongressकाँग्रेस