Latur: थरारक Video! हसाळाची जि. प. शाळा कोसळली; दोन बालके जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 19:52 IST2021-07-18T19:45:02+5:302021-07-18T19:52:02+5:30

School colapse in Latur: हसाळा येथे १५० मुलांची शाळा आहे. बालवाडी आणि पहिलीचे वर्ग चालविले जातात. सध्या कोरोनामुळे वर्ग भरत नाहीत. मात्र शाळेला दरवाजा नसल्याने रविवारी काही मुले तिथे खेळत गेली.

Latur: Hasala ZP School collapsed Video; Two children were injured | Latur: थरारक Video! हसाळाची जि. प. शाळा कोसळली; दोन बालके जखमी

Latur: थरारक Video! हसाळाची जि. प. शाळा कोसळली; दोन बालके जखमी

लातूर : औसा तालुक्यातील हसाळा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीतील एका खोलीचा काही भाग रविवारी सकाळी तर दुपारी साडेतीन वाजता संपूर्ण वर्गखोली कोसळली. यामध्ये सकाळच्या घटनेत शाळेला दरवाजा नसल्याने तिथे गेलेली दोन बालके जखमी झाली आहेत. (ZP school collapsed in Latur's Hasala village.)

हसाळा येथे १५० मुलांची शाळा आहे. बालवाडी आणि पहिलीचे वर्ग चालविले जातात. सद्या कोरोनामुळे वर्ग भरत नाहीत. मात्र शाळेतील त्या वर्गखोलीला दरवाजा नसल्याने रविवारी काही मुले तिथे खेळत गेली. दरम्यान रविवारी सकाळी अचानक छताचा काही भाग पडल्याने रणजित अतुल पवार (वय ५ वर्षे) रामेश्वर बबनराव पाटील (वय ५ वर्षे) हे दोघे जखमी झाले. त्यानंतर शाळेतील त्या खोलीत कोणीच थांबले नाही. दुपारनंतर साडेतीनच्या सुमारास पूर्ण वर्गखोली कोसळली. त्याचे काहीजणांनी चित्रीकरण केले. कोरोनाने शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असून हासाळा गावातील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी कोरोना इष्टापत्ती ठरल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. शनिवारी सुद्धा त्या खोलीचा काही भाग पडला होता.

खोली वापरात नव्हती...
घटनास्थळी भेट देऊन आलेल्या गटविकास अधिकारी म्हणाल्या, वर्गखोली वापरात नव्हती. शिवाय तिथे कोणीही जखमी झाल्याचे आढळून आले नाही. कोणी तशी माहिती आमच्या समोर दिली नाही. दरम्यान वर्गखोलीचे बांधकाम कधी झाले आणि ती कोसळली कशी याबाबत खुलासा झाला नाही.

Web Title: Latur: Hasala ZP School collapsed Video; Two children were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.