शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

खोदकाम सुरु असताना जेसीबीत स्फोट; दोघे ठार, एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 16:24 IST

JCB Blast : अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील देवकरा शिवारात ही दोन विहिरींचे खोदकाम सुरू होते.

ठळक मुद्देजेसीबी शेतातील खड्ड्यात जाऊन आदळल्याने स्फोट होऊन आग लागल्याचे गावकरी सांगत आहेत.अर्धा किमीपर्यंत जेसीबीचे पत्रे उडून गेले होते. तसेच दोन किमी अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज

किनगाव (जि. लातूर) : जेसीबीच्या साह्याने शेतीत विहीर खोदकाम सुरु असताना अचानकपणे जेसीबीने पेट घेऊन स्फोट झाला. त्यामुळे जेसीबीचे पत्रे उडून जबर मार लागल्याने दोघेजण ठार झाले तर एकजण जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री ७.३० ते ८ वा. च्या दरम्यान अहमदपूर तालुक्यातील देवकरा शिवारात घडली आहे. हा स्फोट नेमका कशाने झाला, हे अद्यापही उलगडले नाही.

प्रभाकर विनायक मुरकुटे (६३, रा. देवकरा, ता. अहमदपूर), बाबुराव पांडुरंग दहिफळे (६८, रा. कोळवाडी, ता. अहमदपूर) असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी आपल्या शेतात जेसीबीच्या साह्याने विहीर खोदकाम करीत आहेत. अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील देवकरा शिवारात ही दोन विहिरींचे खोदकाम सुरू होते. प्रभाकर मुरकुटे यांच्या विहिरीचे जवळपास ३५ ते ४० फुट खोदकाम झाले असून उर्वरित दगडाचे खडक बनविण्यासाठी चैनवरील जेसीबी जात होते. तेव्हा प्रभाकर मुरकुटे व बाबुराव दहिफळे हे दोघे जेसीबीच्या मागे जात होते. अचानकपणे जेसीबीने पेट घेऊन आग लागली आणि स्फोट झाला. यात जेसीबीचे पत्रे उडून जबर लागल्याने सदरील दोघे ठार झाले.

चालक भगतराज नारायण सारेआम (रा. चिलखा, मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलविण्यात आले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जॉन डॅनियल बेन, जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, किनगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कृष्णा मुरकुटे यांच्या जबाबावरुन प्रभाकर मुरकुटे व बाबुराव दहिफळे यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद किनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.

दोन किमीपर्यंत आवाज...जेसीबी शेतातील खड्ड्यात जाऊन आदळल्याने स्फोट होऊन आग लागल्याचे गावकरी सांगत आहेत. जेसीबीचा स्फोट एवढा मोठा होता की, अर्धा किमीपर्यंत जेसीबीचे पत्रे उडून गेले होते. तसेच दोन किमी अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. हा स्फोट नेमका कशाने झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. आवाज घेण्यासाठी विहिरीमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या असाव्यात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नेमके कारण सांगता येत नाही...सदरील शेतातून महावितरणच्या विद्युत तारा गेल्या आहेत. जेसीबीचा त्या विद्युत तारांना स्पर्श झाला असावा. त्यातूनच जेसीबी पेट घेऊन स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र निश्चित सांगता येत नाही. नेमके कारण लवकरच समजेल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगlaturलातूर