शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलांवरील पथदिव्यांअभावी नागरिकांची गैरसोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST

उदगीर शहराचा वाढता भौगोलिक विकास पाहता शासनाने शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर केले आहेत. उदगीर-लातूर मार्गावरील नळेगाव रोड येथील व ...

उदगीर शहराचा वाढता भौगोलिक विकास पाहता शासनाने शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर केले आहेत. उदगीर-लातूर मार्गावरील नळेगाव रोड येथील व बीदर रोडवरील दोन उड्डाणपूल सध्या कार्यान्वित आहेत. या उड्डाणपुलांच्या पलीकडे शहराची उपनगरे व ग्रामीण भाग असल्यामुळे या दोन्ही उड्डाणपुलांवर रात्रीच्या वेळी मोठी वर्दळ असते. नगरपालिकेने मागील अडीच वर्षांपूर्वी नळेगाव रोडवरील उड्डाणपूल मंजूर करण्याबाबतचा एकमुखी ठराव मंजूर केला. परंतु, त्या ठरावाचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. रात्रीच्या वेळी या उड्डाण पुलावरून जाताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधले खरे मात्र या उड्डाणपुलांवरून रात्रीच्या वेळी जाण्या-येण्यासाठी पथदिवे नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अंधाराचा गैरफायदा घेऊन महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. पथदिवे बसविल्यास चोरीच्या घटनांना आळा बसेल, त्यामुळे पथदिवे बसविण्याची मागणी होत आहे.

निवेदन देऊनही मागणीकडे दुर्लक्ष...

उड्डाणपुलांचा वापर करणाऱ्या एसटी कॉलनी भागातील नागरिकांनी तीन वर्षांपूर्वी उदगीरच्या नगरपालिकेला निवेदन देऊन उड्डाणपुलांवर पथदिवे बसवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नगरपालिकेने ठराव घेतला. मात्र, अंमलबजावणीच केली नाही. दरम्यान, नगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ संपण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना तरी या ठरावाची अंमलबजावणी होते की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.