शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार?  लातूरात ५ मध्यम प्रकल्पांत शिल्लक राहिला १२ टक्के जलसाठा!

By हरी मोकाशे | Updated: February 28, 2024 18:44 IST

गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने आणि दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिक गडद होऊ लागली आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत तर पाच प्रकल्पांमध्ये केवळ १२.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार? अशी चिंता ग्रामीण भागातील नागरिकांना लागली आहे.

गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे-नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम, लघु प्रकल्पांत अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासून पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. आगामी काळात पाणीटंचाई आणखीन तीव्र होण्याची भीती व्यक्त करत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी उपाययाेजनात्मक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच प्रकल्पातील पाणी आरक्षित केले आहे. फेब्रुवारीत पाणीटंचाई वाढली आहे.

जिल्ह्यातील ११८ गावे-वाड्या तहानल्या...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - १७औसा - ३०निलंगा - १४अहमदपूर - ३७चाकूर - ०२शिरूर अनं. - ०३उदगीर - ०३देवणी - ०२एकूण - ११८

२५ गावांना अधिग्रहणाचे पाणी...जिल्ह्यातील एकूण ११८ गावे आणि वाड्यांनी अधिग्रहणासाठी १६२ प्रस्ताव दाखल केले होते. पंचायत समितीच्या पाहणीनंतर ४ गावांचे ११ प्रस्ताव रद्द करण्यात आले. ८९ गावांचे १०३ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी २५ गावांना २८ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

आठ गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर या आठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला. त्यापैकी एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मध्यम प्रकल्पांत १५ दलघमी पाणी...जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. उर्वरित पाच मध्यम प्रकल्पांत १५.१५३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर - २.४५१, देवर्जन - १.७३९, साकोळ - २.४७०, घरणी - ३.९७७ आणि मसलगा प्रकल्पात ४.५१६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

सर्वाधिक साठा निलंगा प्रकल्पात...प्रकल्प - उपयुक्त पाणी (%)रेणापूर - ११.९२देवर्जन - १६.२८साकोळ - २२.५६घरणी - १७.७०मसलगा - ३३.२१एकूण - १२.४०

टॅग्स :WaterपाणीDamधरणlaturलातूर