शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावात आढळलेला हातबाॅम्ब केला निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंदनजीक असलेल्या महादेववाडी येथील पाझर तलावात शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास तुळशीराम ज्ञानाेबा वलसे यांना ...

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंदनजीक असलेल्या महादेववाडी येथील पाझर तलावात शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास तुळशीराम ज्ञानाेबा वलसे यांना हातबाॅम्बसदृश्य वस्तू असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत तातडीने शिरुर ताजबंद येथील पाेलीस कर्मचाऱ्यांना माहिती दिली. घटनास्थळी लातूर येथील बाॅम्ब शाेधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने या हातबाॅम्बची पाहणी करुन त्यावर नियंत्रण मिळविले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हातबाॅम्ब निकामी करता आला नाही. दरम्यान, पाेलिसांनी परिसरातील वाहतूक आणि वर्दळीचा अंदाज घेत रविवारी हातबाॅम्ब निकामी करण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळपासूनच लातूर आणि नांदेड येथील पथके दाखल झाली. अतिशय सावधपणे हा हातबाॅम्ब बाॅम्बशाेधक आणि नाशक पथकाने निकामी केला आहे. घटनास्थळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढाकणे, पाेलीस निरीक्षक सुनील बिर्ला, नायब तहसीलदार गणेश तांदळे, सहायक पाेलीस निरीक्षक गजेंद्र सराेदे यांनी भेट देवून पाहणी केली आहे.

हातबाॅम्ब आला काेठून, याचा शाेध सुरु...

लातूर ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाझर तलावात हातबाॅम्ब आला काेठून, याबाबत पाेलिसांच्या विशेष पथकाकडून तपास केला जात आहे. हातबाॅम्ब निकामी केल्यानंतर घटनास्थळवरील त्याचे तुकडे आणि इतर साहित्य न्यायवैद्यक प्रयाेगशाळेला पाठविण्यात आले आहेत. या प्रयाेगशाळेचा अहवाल आल्यानंतर परिस्थितीचा अंदाज येइल. असे पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.

फोटो कॅप्शन :

शिरूर ताजबंद नजिकच्या तलाव परिसराची पाहणी करताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोनि. सुनील बिर्ला.

फोटो फाईल नेम :

०३एलएचपी शिरूर.टीफ