शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

लातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 4:54 AM

उदगीर, निलंग्यातील सरवडी, औसा तालुक्यातील उजनी परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ आंबा, टरबूज, खरबूज, द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर टोमॅटोचा चिखल झाला.

लातूर  - उदगीर, निलंग्यातील सरवडी, औसा तालुक्यातील उजनी परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ आंबा, टरबूज, खरबूज, द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर टोमॅटोचा चिखल झाला.अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील राशीच्या कामात व्यत्यय आला. शेतकºयांसह व्यापाºयांची धावपळ उडाली होती़ शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ दुपारी अडीचच्या सुमारास औसा शहरासह तालुक्यातील नांदुर्गा, गुबाळ, मंगरूळ, किल्लारी परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली़ त्यानंतर जोरदार वादळी वाºयास सुरुवात झाली़ बेलकुंड, उजनीमध्ये गारांसह मुसळधार पाऊस झाला़ दापेगाव येथील शाळेचे पत्रे उडून गेले आहेत़ दापेगावसह नागरसोगा, जवळगा परिसरातही पाऊस झाला. निलंगा तालुक्यातील हडोळी, सरवडी परिसरात गारांचा पाऊस झाला़ उदगीर शहरातही गारा पडल्या. शिरूर अनंतपाळ, देवणी व चाकूर तालुक्यालाही अवकाळीने झोडपले़ त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानाला भरपाई मिळणार की नाही याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे़लोहाºयात बाजारकरूंचे हाललोहारा शहरासह तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. लोहाºयात शुक्रवारी आठवडी बाजार भरला होता. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारकरूंचे काही प्रमाणात हाल झाले. तालुक्यातील बेलवाडी, माकणी, सास्तूर आदी भागातही हलका पाऊस झाला.वीज पडून दोन जनावरे दगावलीउमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी विजांचा कडकडाट, वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे ज्वारी, गहू, द्राक्ष, आंबा, कलिंगड व काकडीसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय, तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडून दोन जनावरे दगावल्याच्याही घटना घडल्या.शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास तालुक्यातील नारंगवाडी, माडज, नाईचाकूर, मुळज, तुरोरी, तलमोड, कोळसुर, जगदाळवाडी, आष्टाजहागीर आदी गावांच्या शिवारात अचानक वादळी वारा व गारपीट झाली. यात काढणीला आलेली ज्वारी व गव्हाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले.कडबा भिजल्याने चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वादळी वाºयामुळे आंबा, द्राक्षबागा व कलिंगड पिकाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, मुळज येथे तुकाराम भालके यांच्या शेतात बैल तर त्रिकोळीत रवींद्र हंगरगेंची गाय वीज पडून दगावल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.उस्मानाबादला अवकाळी पाऊसउमरगा (उस्मानाबाद) तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. ज्वारी, गहू, द्राक्ष, आंबा, कलिंगड व काकडीसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. दोन ठिकाणी वीज पडून दोन जनावरे दगावली. लोहारा येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बेलवाडी, माकणी, सास्तूर आदी भागातही हलका पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसHailstormगारपीटlaturलातूर