दिल्लीतील गंगाधर व संजय जाधवची सीबीआय पथक करणार कसून चौकशी !

By राजकुमार जोंधळे | Updated: July 8, 2024 12:17 IST2024-07-08T12:17:25+5:302024-07-08T12:17:42+5:30

देशभर नीट प्रकरण ; लातुरातील आराेपीच्या काेठडीची मुदत आज संपणार

Gangadhar and Sanjay Jadhav will be thoroughly investigated by the CBI team | दिल्लीतील गंगाधर व संजय जाधवची सीबीआय पथक करणार कसून चौकशी !

दिल्लीतील गंगाधर व संजय जाधवची सीबीआय पथक करणार कसून चौकशी !

लातूर : नीट गुणवाढीसंदर्भात विद्यार्थी-पालकांना आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गुन्ह्याची व्याप्ती देशभर असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यानुसार देशभरत ही यंत्रणा विविध राज्यात सक्रीय झाली आहे. गंगाधरला आंध्र प्रदेशातून अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या कारनामे समाेर आले. लातुरातील गुन्ह्यात गंगाधर अन् संजय जाधव याची समाेरासमाेर चाैकशी केली जाणार आहे. यासाठी सीबीआय गंगाधरला लातुरात आणणार असल्याचे समाेर आले आहे.

सीबीआया काेठडीत असलेल्या गंगाधरने विविध राज्यात एजंट नेमल्याची माहिती उघड झाली असून, यातून काेट्यवधींची माया जमा करण्याचे त्याचे नियाेजन असल्याचे समाेर आले आहे. आता त्याच्या सीबीआयने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या चाैकशीतून विविध राज्यातील गुन्ह्यांची उकल हाेणार आहे. त्याने एजंटाच्या माध्यमातून किती पालक-विद्यार्थ्यांना आमिष दाखवत गंडविले, याचाही तपास सीबीआयच्या विविध पथकाकडून केला जात आहे. गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील गंगाधर हा म्हाेरक्या असल्याचे आता समाेर येत आहे. 

अटकपूर्व जामिनासाठी इरण्णाची न्यायालयात धाव..?

गुन्हा दाखल झाल्यापासून तपास यंत्रणांना गुंगारा देत पसार झालेला इरण्णा काेनगलवार याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी लातूर येथील विशेष न्यायालयात अर्ज केल्याची माहिती शनिवारी समाेर आली. त्याच्याही अटकेसाठी सीबीआयचे पथक मागवार आहे.  

महाराष्ट्र-बिहार कनेक्शनचा शाेध...

लातुरात आठ दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या सीबीआयकडून नीट प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहार कनेक्शनचा शाेध घेतला जात आहे. तपास यंत्रणाच्या हाती लागलेल्या दहापैकी सात ते आठ प्रवेशपत्रे बिहार राज्यातील असल्याचे समाेर आले आहे. 

घराच्या झडतीत सीबीआय पथकाच्या हाती लागले पुरावे...

संशयीत आराेपींच्या घराची सीबीआयने झडती घेतली असून, गत आठ दिवसांपासून कसून चाैकशी केली जात आहे. आठवडाभरातील तपासात अनेक धागेदाेरे, पुरावे हाती लागल्याचे शनिवारी लातूर न्यायालयात सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले. नीट प्रकरण देशपातळीवर असून इतर आराेपींनाही अटक करायची आहे.
 

Web Title: Gangadhar and Sanjay Jadhav will be thoroughly investigated by the CBI team