शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांचा 'गेम ओव्हर'! पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहनिबंधक, लिपिकाला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:07 IST

लातूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

लातूर : मत्स्य व्यवसायाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी, लातूर येथील सहनिबंधक आणि कनिष्ठ लिपिकाला विशेष न्यायालयाने दोषी ठरवून कारावासाची शिक्षा लातूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय क्र. १ चे न्यायाधीश आर.आर. भोसले यांनी मंगळवारी सुनावली.

एसीबीच्या सूत्रांनी सांगितले, या लाच प्रकरणातील फिर्यादीने आपला मत्स्य व्यवसायाचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयात सादर केला होता. दरम्यान, हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या बदल्यांमध्ये सहकारी संस्था-दुग्ध, सहनिबंधक बालाजी विठ्ठलराव काळे (वय ३५) यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम आरोपी बालाजी काळे यांच्या सांगण्यावरून कनिष्ठ लिपिक सुरेश राघोबा माळी (वय ५७) यांनी स्वीकारली होती. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लातूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय क्र. १ चे न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी बालाजी काळे याला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये २ वर्ष ६ महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड, तसेच कलम १३ (२) अन्वये ३ वर्षे साधा कारावास आणि १० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली तर आरोपी सुरेश माळी याला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम १२ अन्वये २ वर्षे साधा कारावास आणि ७ हजार ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

गुन्ह्याचा तपास लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक जे. आर. भंडारवार यांनी केला. सरकार पक्षाच्या वतीने सहायक शासकीय अभियोक्ता रमाकांत पी. चव्हाण पाखरसांगवीकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले तर कोर्ट अंमलदार भागवत कठारे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Officials Jailed for Bribery in Fisheries Proposal Case

Web Summary : Latur officials, a co-registrar and clerk, were convicted for accepting a 5,000-rupee bribe to approve a fisheries proposal. The court sentenced them to imprisonment and fines under the Prevention of Corruption Act, following a 2012 police complaint and ACB investigation.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर