देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 07:03 IST2024-03-04T07:03:07+5:302024-03-04T07:03:34+5:30

हे चौघेही मित्र तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. चालक नर्मन कात्रेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

Four friends on their way to Devdarshan killed in accident, incident on Latur-Nanded highway | देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना

देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना

 
लातूर : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात ४ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लातूर- नांदेड मार्गावर रविवारी पहाटे घडली. 

माेनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके व नर्मन कात्रे अशी मृतांची नावे आहेत. हे चौघेही मित्र तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. चालक नर्मन कात्रेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.
 

 

Web Title: Four friends on their way to Devdarshan killed in accident, incident on Latur-Nanded highway