जीवन विकास प्रतिष्ठानमध्ये ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:44+5:302021-09-18T04:21:44+5:30

ॲड. विजयगोपाल मूकबधिर विद्यालयात कर्मचारी तुकाराम मुसणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक जी. एल. जोगदंड, आर. ...

Flag hoisting at Jeevan Vikas Pratishthan | जीवन विकास प्रतिष्ठानमध्ये ध्वजारोहण

जीवन विकास प्रतिष्ठानमध्ये ध्वजारोहण

ॲड. विजयगोपाल मूकबधिर विद्यालयात कर्मचारी तुकाराम मुसणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक जी. एल. जोगदंड, आर. डी. शर्मा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी समाजकल्याण उपायुक्त अविनाश देवशटवार यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, राजू गायकवाड, दत्तात्रय कुंभार यांची उपस्थिती होती.

सौ. सुशीलादेवी देशमुख मुलींचे मूकबधिर विद्यालयात जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी यांची तसेच विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन :

जीवन विकास प्रतिष्ठान संचलित मतिमंद विद्यालयात समाजकल्याणचे उपायुक्त अविनाश देवशटवार यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: Flag hoisting at Jeevan Vikas Pratishthan