शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच झाले ‘लालपरी’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST

औसा तालुक्यातील बेलकुंड हे जवळपास ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात पूर्वी सोलापूर आणि लातूरला जाणाऱ्या एस.टी. ...

औसा तालुक्यातील बेलकुंड हे जवळपास ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात पूर्वी सोलापूर आणि लातूरला जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसेस येत असत; मात्र जवळपास २० वर्षांपासून गावात बस येणे बंदच झाले होते. परिणामी, तालुक्याला शिक्षणासाठी, कार्यालयीन, खासगी कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची, विद्यार्थ्यांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत हाेती. शिवाय, बेलकुंड येथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना औसा अथवा लातूरला जाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करत बेलकुंडमोड गाठावे लागत हाेते. मोडवर थांबूनही अनेक बसेस उड्डाण पुलावरून जात असल्याने प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत थांबावे लागत आहे. दरम्यान, सरपंच विष्णू कोळी यांनी यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला हाेता. गत २० वर्षांपासून होत असलेल्या बसच्या मागणीकडे महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंगळवारपासून औसा-बेलकुंड ही नवीन बससेवा सुरू केली आहे. यातून प्रवाशांची साेय हाेणार आहे.

गावकऱ्यांची झाली साेय...

गावात बस दाखल झाल्यानंतर फटाके फोडून ‘लालपरी’चे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी बसची पूजा करून बसचालक अनिल गोरे, वाहक एम.एच. नागरगोजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच विष्णू कोळी, उपसरपंच सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य अपसिंगेकर,व्यंकट गोरे, बलभीम बंडगर, अनिल तोळमारे, गणेश यादव यांच्यासह गावकरी, प्रवासी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.