शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात 'बॅग'वरून रणकंदन! काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले; मारहाण, पैसे वाटपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:28 IST

लातूर महापालिका निवडणुकीत रविवारी काँग्रेस उमेदवार-भाजप पदाधिकाऱ्यात प्रभाग १८ मध्ये बॅगवरून झटापट

लातूर : महापालिका निवडणुकीत प्रभाग १८ मध्ये रविवारी सकाळी काँग्रेस उमेदवार आणि भाजप पदाधिकाऱ्यांत बॅगच्या ओढाओढीत झटापट झाल्याची व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली. रस्त्यावर घडलेल्या प्रकारात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या संदर्भात संजय गीर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅलीला जात असताना काँग्रेसचे उमेदवार सुंदर पाटील कव्हेकर व त्यांच्या समर्थकांनी माझ्या हातातील बॅग ओढून घेतली. बॅगमध्ये पैसे आहेत का, विचारत धक्काबुक्की केली. त्यांतील कागदपत्रे दाखवली तरी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शर्टचा खिसा फाडला; तसेच जिवे मारण्याची धमकी दिली; तर भाजप कार्यकर्ते राजकुमार शेटे यांनी तक्रारीत म्हटले आहे, मी घराजवळ थांबलो असता काँग्रेस उमेदवार सुंदर पाटील व कार्यकर्ते आले. त्यांनी मला धक्काबुक्की केली. ‘तू माझा प्रचार केलास, तर २५ हजार देतो,’ असे प्रलोभन दिले. त्यावेळी मी नकार दिला असता मला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सुंदर पाटील यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, असेही शेटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांत तक्रार दिली आहे : काँग्रेस उमेदवार सुंदर पाटीलकाँग्रेस उमेदवार सुंदर पाटील कव्हेकर म्हणाले, ‘भाजप उमेदवारासाठी पैसे वाटले जात असल्याची माहिती मतदारांकडून मला मिळाली होती. तिथे जाऊन आम्ही थांबलो असता समोरून भाजपाचे संजय गीर हे बॅग घेऊन जात होते. त्यांना बॅगमध्ये पैसे आहेत का,’ असे विचारले. धक्काबुक्की किंवा मारहाण केलेली नाही. या उलट मतदारांना प्रलोभन देणे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची तक्रार आम्हीही पोलिसांत दिली. व्हिडीओ क्लिप बघा सत्य कळेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, याबाबत सायंकाळपर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती.

मतदार धडा शिकवतील : अदिती पाटील-कव्हेकरप्रभागातील भाजपच्या उमेदवार अदिती पाटील-कव्हेकर म्हणाल्या, ‘या गुंडगिरीला मतदार धडा शिकवतील. बॅगमधील कागदपत्रे दाखविली, तरी मारहाण केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.’

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Congress-BJP Clash Over 'Bag'; Assault and Bribery Allegations

Web Summary : Clash in Latur over a bag between Congress and BJP workers. Accusations of assault, bribery, and threats exchanged. Both parties filed police complaints; investigations are ongoing.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेस