शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

लातूर / रेणापूर : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ...

लातूर / रेणापूर : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. हा अपघात रेणापूर येथील एका शाळेजवळ घडला. मयत बाप-लेकावर बुधवारी दुपारी रेणापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रेणापूर पाेलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, राहुल गाेविंद सुरवसे (वय ३६) यांचा खराेळा येथे ढाबा असून, ते नेहमीप्रमाणे आपला मुलगा विश्वजित (वय १२) याला घेऊन मंगळवारी रात्री दुचाकीवरुन रेणापूर येथील आपल्या घराकडे निघाले हाेते. दरम्यान, एका शाळेजवळ आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातात राहुल सुरवसे यांच्या छातीला, पाेटाला आणि मुलाच्या डाेक्याला जबर मार लागला. दाेघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डाॅ. एस. एस. शेख यांनी त्यांना मृत घाेषित केले. मयत राहुल सुरवसे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दाेन मुली असा परिवार आहे.

रेणापूर पाेलीस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहाय्यक पाेलीस अधिकारी श्रीराम माचेवाड, सहाय्यक पाेलीस उपनिरीक्षक राजकुमार गुळभेले, पाेलीस कर्मचारी संताेष ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन नाेंद करण्यात आली आहे.