शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार

By हणमंत गायकवाड | Updated: March 13, 2023 18:25 IST

उन्हाळी हंगामात ९ हजार ८० हेक्टर क्षेत्र भिजणार

लातूर : मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीत १२६.४२९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, यातील ६७ दलघमी पाणी सिंचनासाठी वापरले जाणार आहे. यातून ९ हजार ८० हेक्टर क्षेत्र उन्हाळ्यात भिजणार आहे. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून ५४ दलघमी पाणी सिंचनासाठी सोडले जाणार असून, यातून ६४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली राहील, तर उन्हाळी हंगाम जलाशय पाणीवापर १३ दलघमी नियोजित आहे. त्यातून दोन हजार ६०० हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. एकूण ९ हजार ८० हेक्टर क्षेत्राला या हंगामात मांजरा प्रकल्पातून पाणी मिळणार आहे.

१ मार्च २०२३ ते ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत उन्हाळी हंगाम राहणार आहे. या चार महिन्याच्या हंगामात मांजरा प्रकल्पातून तीन वेळा पाणी सोडले जाणार आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाईल. या हंगामात केवळ कालव्याच्या पाण्यावर विसंबून न राहता विहीर तसेच बोरच्या आधारावर जास्त पाण्याची पिके घ्यावीत. कमी पाणी लागणाऱ्या पिकांसाठी प्रकल्पाच्या पाण्याचा आधार घ्यावा, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

२९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन...मांजरा प्रकल्पात एकूण १२६.४२९ दलघमी पाणीसाठ्यापैकी या उन्हाळ्यात २९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल, असा अंदाज धरण व्यवस्थापनाचा आहे.

सिंचनाव्यतिरिक्त ४१ दलघमी पाणीवापरसिंचनासाठी एकूण ६७ पाणी वापरले जाणार आहे, तर सिंचनाव्यतिरिक्त पिण्यासाठी आणि व अन्य कामांसाठी ४१ दलघमी पाण्याचा वापर होणार आहे. मांजरा प्रकल्पामध्ये उन्हाळी हंगामासाठी ८५.४२९ पाणीसाठा उपलब्ध आहे.

गाळामुळे १६.२२७ दलघमी पाणी साठवण क्षमतेत घट...गाळ सर्वेक्षण अहवालानुसार गाळामुळे साठवण क्षमतेत घट झालेली आहे. १६.२२७ दलघमी पाणी साठवण क्षमतेत घट आहे. बाष्पीभवनामुळे २९ आणि गाळामुळे १६.२२७ असे एकूण ४५.२२७ दलघमी पाणी कमी होणार आहे.

मांजरा प्रकल्पातील पाणी वापराचे असे आहे नियोजन...उपयुक्त पाणीसाठा : १२६.४२९ दलघमीगाळामुळे साठवण क्षमतेत घट : १६.२२७ दलघमीबाष्पीभवन : २९.०० दलघमीबिगरसिंचन पाणीवापर : १२ दलघमीएकूण सिंचनाव्यतिरिक्त पाणीवापर : ४१.०० दलघमीउन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाणीसाठा : ८५.२२९उन्हाळी हंगाम जलाशय पाणीवापर : १३ दलघमीउन्हाळी हंगाम कालवा पाणीवापर : ५४ दलघमीउन्हाळी हंगाम पाणी पाळी संख्या : ०३उन्हाळी हंगाम एकूण पाणीवापर : ६७ दलघमी

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणFarmerशेतकरीagricultureशेती