शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नपत्रिका, बोर्डाचे ‘गणित’ बिघडले : विद्यार्थी दोन तास ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:16 PM

शहरातील महात्मा फुले विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र असून या केंद्रावर सोमवारी गणित भाग १ (बीजगणित) पेपर होता.

अहमदपूर (जि. लातूर) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या दहावी परीक्षा केंद्रावर गणित भाग १ (बीजगणित) विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकाऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्यामुळे विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत राहावे लागले. बोर्डाच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार झाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहरातील महात्मा फुले विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र असून या केंद्रावर सोमवारी गणित भाग १ (बीजगणित) पेपर होता. परीक्षा केंद्रावर इंग्रजी माध्यमाचे २९३, मराठी माध्यमाचे २८९ व उर्दू माध्यमाचे २२ असे एकूण ६०४ परीक्षार्थी होते. विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता परीक्षा दालनात प्रवेश देण्यात आला. मात्र १० वाजून ४० मिनिटांनी सदरील सीलबंद प्रश्नपत्रिका संचालकांनी उघडली असता इंग्रजी माध्यमाच्या सीलबंद लिफाफ्यात मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका असल्याचे लक्षात आले. सदरील प्रश्नपत्रिकेच्या पाकिटावरच्या अ आणि ब लिस्टवरही इंग्रजीचा उल्लेख होता. मात्र आत मराठी माध्यमाच्या ३०० प्रश्नपत्रिका मिळाल्यामुळे गोंधळ वाढला. इंग्रजी माध्यमाच्या केवळ ४० प्रश्नपत्रिका होत्या. ही बाब लक्षात येताच केंद्र संचालकांनी परिरक्षक आर.पी. चव्हाण  व गटशिक्षणाधिकारी बी.एम. डोकाडे यांना कल्पना दिली. संबंधितांनी परीक्षा मंडळाकडे दूरध्वनीवरून झालेला प्रकार सांगितला. स्थानिक केंद्रावरून प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र प्रश्नपत्रिका अपुºया असल्याने बोर्डाकडून १२.४५ मिनिटांनी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका लातूरहून मागवण्यात आल्या. सदर प्रश्नपत्रिका आल्यानंतर दुपारी १२.५० ला विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आल्या. त्यामुळे सकाळी साडेदहा वाजता आलेले विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल अडीच तास ताटकळत बसावे लागले. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करून केंद्र संचालकांना जाब विचारला. दरम्यानच्या काळात बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आल्यानंतर परीक्षा सुरळीत सुरू झाल्या.

विद्यार्थ्यांना परीक्षेएवढा वेळ... परीक्षेला प्रश्नपत्रिकेच्या गोंधळामुळे दोन तासाचा उशीर झाला तरी विभागीय मंडळाकडून परवानगी घेऊन १२.५० पासून १.०० वाजेपर्यंत वाचनासाठी व १ ते ३ पर्यंतचा वेळ प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी देण्यात आला. दरम्यान, या वेळेर विद्यार्थ्यांना अल्पोपाहाराची व्यवस्था केली. तसेच मराठी माध्यमाची परीक्षाही ठरलेल्या वेळेप्रमाणे पार पडल्याचे केंद्र संचालक एस.आर. जाधव यांनी सांगितले.

छपाई विभागाची चूक... सदरील प्रश्नपत्रिकासंदर्भात ११.२० वाजता विभागीय परीक्षा मंडळाकडे तक्रार आली. १२.४५ पर्यंत लातूर विभागीय मंडळाकडून इंग्रजी माध्यमाच्या १७० प्रश्नपत्रिका व स्थानिक केंद्रावरील १२५ प्रश्नपत्रिका घेऊन दुपारी १ ते ३ या दोन तासात परीक्षा घेण्यात आल्या. सदरील चूक ही छपाई व पॅकिंग विभागाची  असून दोषींवर कार्यवाही करू, असे बोर्डाचे सहसचिव चित्तप्रकाश देशमुख यांनी सांगितले.

विद्यार्थी पाच तास परीक्षा दालनात... सर्व विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमाचे असून अहमदपूरचे गुणवत्ताधारक आहेत. त्यांना पाच तास एकाच दालनात बसविणे हे अन्यायकारक असून परीक्षेत कमी गुण मिळाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असे जागरूक पालक सतीश ननीर म्हणाले.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८examपरीक्षा