दीड कोटींची अफरातफर; दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:42+5:302021-06-16T04:27:42+5:30

पोलिसांनी सांगितले की, पानगाव येथील महाराष्ट्र मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन दिलीपराव आगळे व सचिव श्रीकांत आगळे यांनी संगनमत ...

Embezzlement of Rs 1.5 crore; Both were charged | दीड कोटींची अफरातफर; दोघांवर गुन्हा दाखल

दीड कोटींची अफरातफर; दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले की, पानगाव येथील महाराष्ट्र मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन दिलीपराव आगळे व सचिव श्रीकांत आगळे यांनी संगनमत केले. २ फेब्रुवारी १९९४ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत त्यांनी शासनाची फसवणूक करीत संस्थेच्या नावे जागा खरेदी, इमारत बांधकाम, बोअर खर्च, प्रवास खर्च, लाईटबिल, वॉचमन पगार आदी बाबींवर शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाकडून मिळालेल्या कर्ज, भागभांडवलाची व सभासदांकडून जमा केलेली भागभांडवलाची एकूण १ कोटी ६५ लाख ५७ हजार १८८ रुपयांची बनावट कीर्द व कागदपत्र तयार केले. ते खरे आहेत, असे भासविल्याचे विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालात नमूद करण्यात आले. त्यावरून विशेष लेखापरीक्षक बापूराव वाळके यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि माचेवाड करीत आहेत.

Web Title: Embezzlement of Rs 1.5 crore; Both were charged