हाळी जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:40+5:302021-03-10T04:20:40+5:30

अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फारूख शेख होते तर मंचावर कल्याण पाटील, अशोकराव माने, सरपंच मायाताई गायकवाड, उपसरपंच राजकुमार ...

Distribution of uniforms in Zilla Parishad schools | हाळी जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप

हाळी जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप

अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फारूख शेख होते तर मंचावर कल्याण पाटील, अशोकराव माने, सरपंच मायाताई गायकवाड, उपसरपंच राजकुमार पाटील, काशीम शेख, मुख्याध्यापक रमाकांत मोटे, ग्रामविकास अधिकारी मनोहर जानतीने, शेषेराव माने उपस्थित हाेते. पहिली ते सातवीपर्यंतच्या २३६ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तर ग्रामपंचायत सदस्य संगिता बच्चेवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य माधव धनुरे, मीरा शाहीर, संगीता बच्चेवार, मथुरा कांबळे, सुरेखा शिंदे, उपेंद्र काळेगोरे, सिद्धार्थ मसुरे, गौतम कांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रकाश बच्चेवार यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. हाळी येथील महिला बचतगटाच्या वतीने विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आली. सूत्रसंचालन मीनाक्षी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इलियास बेग, रेश्मा शेख, एस. टी राजे यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of uniforms in Zilla Parishad schools