गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:03+5:302021-09-07T04:25:03+5:30

यावेळी रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे अध्यक्ष राजगोपाल मुंदडा, सचिव डॉ. संजय वारद, नंदकिशोर लोया, पुरुषोत्तम नॊगजा, माजी प्रांतपाल डॉ. ...

Distribution of sewing machines to needy women | गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

यावेळी रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे अध्यक्ष राजगोपाल मुंदडा, सचिव डॉ. संजय वारद, नंदकिशोर लोया, पुरुषोत्तम नॊगजा, माजी प्रांतपाल डॉ. हरिप्रसाद सोमाणी, सहायक प्रांतपाल संतोष कासले, उमाकांत मद्रेवार, जहाकीर गोलंदाज, मेहुल कामदार, संजय बोरा, जितेंद्र कोरे, बाळासाहेब खैरे, गुंडरे, विष्णू सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनामुळे अनेक घरातील कमावत्या, कर्त्या पुरुषांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशा कुटुंबातील गृहिणींना, त्याचबराेबर समाजातील गरजू महिलांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपक्रमाचे संयोजक रघुराज बाहेती, मन्मथ पोपडे, लक्ष्मीकांत सोनी, श्रीकांत बेळंबे, शेळके, खानापूरे, पुष्कराज खुब्बा यांची उपस्थिती हाेती.

Web Title: Distribution of sewing machines to needy women