ग्रामसभा नसल्याने विकास कामे मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:23+5:302021-06-03T04:15:23+5:30

शासनाच्या निर्णयानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे आर्थिक वर्ष उलटले तरी एकही ग्रामसभा ...

Development work slowed down due to lack of Gram Sabha | ग्रामसभा नसल्याने विकास कामे मंदावली

ग्रामसभा नसल्याने विकास कामे मंदावली

शासनाच्या निर्णयानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे आर्थिक वर्ष उलटले तरी एकही ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांना खीळ बसली आहे. १ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होत असते. ही ग्रामसभा न झाल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचे लाभार्थी निवडता आले नाहीत. रोहयोचा आराखडा १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजूर केला जातो. पण गेल्या वर्षी ग्रामसभा झाली नाही. गत २६ जानेवारी रोजी ग्रामसभा होईल, अशी आशा होती. परंतु, ती रखडली. वर्षभरात परिसरातील बेलकुंड, उजनी, टाका, मासुर्डी, तुंगी यासह जवळपास आठ गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झाले. नवीन कारभारी सत्तेवर आले. पण अजून एकही ग्रामसभा झाली नाही.

Web Title: Development work slowed down due to lack of Gram Sabha