शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात दहा हजार रुग्णांचे सिटी स्कॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गेल्या वर्षभरातील कोरोना काळात १० हजार ३६२ रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यात ...

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गेल्या वर्षभरातील कोरोना काळात १० हजार ३६२ रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यात आले असून, ४५ हजार ७९४ रुग्णांची एक्सरे तपासणी करण्यात आली आहे. एक्सरे व सिटी स्कॅनच्या तपासणीचा हा उच्चांक असून, सर्वसामान्य तसेच गरजू रुग्णांना या तपासणीचा फायदा झाला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचा क्ष-किरण विभाग २४ तास कार्यरत आहे. गरजूंना माफक दरामध्ये सिटी स्कॅन व एक्सरे तपासणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड रुग्णांसाठी तपासणीच्या दिवशीच अंतिम अहवाल रुग्णांना देण्यात येतो. तसेच सिटी स्कॅन तपासणीमध्ये किती स्टोअर आहे यावरून संसर्गाची लागण किती प्रमाणात झाली याची माहिती त्वरित मिळू शकते. सदर सेवा संस्थेमध्ये उपलब्ध असल्याने रुग्णांना आवश्यक व वेळेत उपचार मिळण्यास मदत होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वाधिक ६ हजार ४५३ रुग्णांचा एक्सरे, एप्रिल २०२१ मध्ये २ हजार १०३ रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यात आले. तपासणी दरम्यान कोरोना संसर्गाची लागण होऊ नये म्हणून क्ष-किरणशास्त्र विभागामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

एक्सरे तपासणीची स्वतंत्र व्यवस्था

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एक्सरे तपासणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अतिदक्षता विभागातील ज्या रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची आवश्यकता आहे, तसेच ज्या रुग्णांचे सिटी स्कॅन करणे शक्य नाही, अशा रुग्णांची जागेवरच (पोर्टेबल एक्सरे) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. गरजूंनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. देशमुख यांच्यासह क्ष-किरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी कोंबडे, उपअधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण, औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलिमा देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव बनसोडे यांनी केले आहे.

महिनानिहाय एक्सरे व सिटीस्कॅन

महिना एक्सरे सिटीस्कॅन

जून २०२० ३४६४ ५५३

जुलै ४९९८ ४३४

ऑगस्ट ६४५३ ४८१

सप्टेंबर ४२२८ ६९५

ऑक्टोबर ३८५५ ७२५

नोव्हेंबर ३३६४ ८१९

डिसेंबर ३९८६ ८१४

जानेवारी २०२१ ३९०२ ८२५

फेब्रवारी ३४३७ ७२६

मार्च ४६३२ ७०९

एप्रिल २३८४ २१०३

मे २०८१ १४७८

एकूण ४५७९४ १०३६२