शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : लातूर जिल्ह्यात १७७ मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 19:56 IST

Corona Virus: सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगावी घेतला जात आहे.

ठळक मुद्देमदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्नआई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत...

लातूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपली लहान मुले पाठीशी ठेवून जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अशा बालकांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांना मदत व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत आई किंवा वडील या दोघांपैकी एक जण गमावलेल्या १७७ मुलांचा शोध लागला आहे. यातील एका मुलाने आई-वडील दोघांनाही गमावले आहे.

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत २ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. तर दुसऱ्या लाटेत प्रौढांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढीस लागले आहे. परिणामी, अनेक बालकांनी आई किंवा वडील या दोघांपैकी एकाला गमावले आहे. पालक गमावलेल्या बालकांचे शिक्षण आणि संगोपन व्हावे, यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत १७७ बालके सापडली आहेत. यामध्ये एका मुलाने आई आणि वडील या दोघांनाही गमावलेले आहे. या बालकांना वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत शासनाच्या वतीने ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक आणि इतर बाबीसाठी मदत केली जाणार आहे.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत...कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा किंबहुना दोघांचाही मृत्यू झाला असल्यास अशा बालकांना महिला व बालविकास विभागाच्या बाल संगोपन योजनेतून मदत करण्यात येणार आहे. या योजनेतून ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत बालकांना मदत दिली जाणार असून, त्यासाठी शाळेत नियमित उपस्थिती असणे बंधनकारक राहणार आहे.

या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगावी घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलाची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे. ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाही अशी परिस्थिती असेल तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल. पाठीशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.

शोध घेतला जात आहेराज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत १७७ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा मानस आहे. या सर्व बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.- वर्षा पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, लातूर.

कोरोनाने आई-बाबा हिरावलेल्यांची संख्यामुले - १००मुली - ७७