शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे थंड पाण्याचा व्यवसाय मंदावला; साध्या पाण्याच्या जारला ग्राहकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोना काळात अनेकांचा जारचे साधे पाणी पिण्याकडे कल वाढला आहे. परिणामी, दरवर्षी उन्हाळ्यात थंड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोना काळात अनेकांचा जारचे साधे पाणी पिण्याकडे कल वाढला आहे. परिणामी, दरवर्षी उन्हाळ्यात थंड पाण्याच्या जारला असणारी अधिक मागणी यंदा मात्र ४० टक्क्यांनी घटली असल्याचे चित्र आहे.

लातूर शहरात जवळपास दीड हजारांहून अधिक जारचे पाणी विक्री करणारे सेंटर आहेत. शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, बाजारपेठेतील दुकाने, सार्वजनिक दुकाने, लग्नसराई, आदी विविध कार्यक्रमांमध्ये पाण्याचे जार मागविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोहळे होत असून, थंड पाण्याच्या जारला होणारी मागणी कमी झाली आहे. तसेच शासकीय कार्यालयांतही उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. तसेच कामासाठी येणाऱ्यांचीही रेलचेल अत्यल्प आहेत. त्यामुळे थंड पाण्याची मागणी घटली आहे. थंडऐवजी जारच्या साध्या पाण्याला मागणी आहे. याचा परिणाम जार विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांवर झाला आहे. लातूर शहरासह ग्रामीण भागातही थंड पाण्याच्या मागणीत कमालीची घट झाली आहे.

कोरोनामुळे अनेकजण गार पाण्याऐवजी साध्या पाण्याला पसंती देत आहेत. दररोज आम्ही साध्या पाण्याचा जार घेतो. घरपोहोच सुविधा मिळत असल्याने कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करतो. दरवर्षी उन्हाळ्यात थंड पाण्याचा जार नियमितपणे घेत होतो. मात्र, कोरोनामुळे थंड पाणी पिऊ नये, असा सल्ला असल्याने जारचे साधे पाणी मागवितो.

- काका ढोले, नागरिक

घरातील मोठा कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्यक्रम, उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहान भागविण्यासाठी थंड पाणीच मागवीत असत. मात्र, गेल्यावर्षीपासून कोरोनामुळे थंडऐवजी साध्या जारला पसंती आहे. घरीही दररोज साधेच पाणी विकत घ्यावे लागते. अनेकांनी थंड पाणी पिण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे जारच्या साध्या पाण्यावरच तहान भागवावी लागते.

- तौफिक पठाण, नागरिक

दरवर्षी थंड पाण्याच्या जारला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात चांगला व्यवसाय होत असतो. मात्र, गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. त्यामुळे अनेक मोठमोठ्या ऑर्डर बंद आहेत. थंड पाण्याऐवजी साध्या पाण्याच्या जारला ग्राहकांची सध्या मागणी आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत ग्राहकांना तत्पर सेवा दिली जात आहे. शासकीय कार्यालयांसह विवाह सोहळे तसेच इतर कार्यक्रमांमध्ये थंड पाण्याचे जार घेतले जात होते. मात्र, थंड पाण्याला मागणी घटली आहे.

- नितीन मंडलापुरे, जार विक्रेते, लातूर