‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री फेडणार; कृषिमंत्रीही मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 06:52 IST2025-07-03T06:51:47+5:302025-07-03T06:52:20+5:30

अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास गोविंद पवार (७५) यांची गावानजीक २ एकर ९ गुंठे शेती आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे.

Cooperation Minister will pay off the loan of 'that' old farmer; Agriculture Minister also comes to help | ‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री फेडणार; कृषिमंत्रीही मदतीला

‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री फेडणार; कृषिमंत्रीही मदतीला

सलीम सय्यद

अहमदपूर (जि. लातूर) : बैलबारदाणाच नव्हे, तर कोळपणीसाठीही पैसे नसल्याने स्वत:च्या खांद्यावर जू घेऊन शेती कसणाऱ्या हडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांना मदतीसाठी सहकारमंत्री व कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जाची परतफेड करण्याचा विश्वास दिला आहे तर कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास गोविंद पवार (७५) यांची गावानजीक २ एकर ९ गुंठे शेती आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे.

आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला

पवार यांनी उसनवारी करून शेतात कापसाची लागवड केली.. पिकांतील तण काढण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी जू खांद्यावर घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रकाशित झाले होते. त्याची दखल सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेऊन तत्काळ मदतीसाठी धावले.

सहकारमंत्र्यांनी जाणल्या अडीअडचणी 

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अंबादास पवार यांच्याशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.

कर्जाची परतफेड आम्ही करू, त्याची चिंता करू नये. हंगामासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच मुलास नोकरीही देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास दिला.

अधिकाऱ्यांनी घेतली भेट

प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी बुधवारी पवार यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी जाणून घेत कृषी विभागाच्या वतीने आवश्यक ती मदत दिली जाईल, असे सांगितले. तर मंगळवारी पवार यांच्या घरी तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, मंडळ कृषी अधिकारी संदीप आयनुले, सहायक कृषी अधिकारी एस. एस. कदम यांनी जाऊन भेट घेतली.

Web Title: Cooperation Minister will pay off the loan of 'that' old farmer; Agriculture Minister also comes to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी