लातूरमध्ये कोचिंग क्लास मालकाची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 07:36 IST2018-06-25T07:36:28+5:302018-06-25T07:36:50+5:30

शहरात काही शिक्षक नेमून कोचिंग क्लास चालविणारे स्टेप बाय स्टेपचे मालक अविनाश चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

The coaching class owner shot dead in Latur | लातूरमध्ये कोचिंग क्लास मालकाची गोळ्या घालून हत्या

लातूरमध्ये कोचिंग क्लास मालकाची गोळ्या घालून हत्या

लातूर : शहरात काही शिक्षक नेमून कोचिंग क्लास चालविणारे स्टेप बाय स्टेपचे मालक अविनाश चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड यांनी सांगितले, चव्हाण हे रात्री आपल्या घराकडे निघाले होते. मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी कार चालवत असलेल्या चालक सिटवरील चव्हाण यांच्या डोक्यात गोळी घातली. त्यात ते जागीच मरण पावले.  ही घटना महसूल कॉलनी भागात मुख्य रस्त्यावर घडली. 

हा थरार पोलिसांना कळल्यानंतर काही क्षणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  परंतु चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झाला. 
त्यांचा स्टेप बाय स्टेप नावाचा क्लास होता. दरम्यान, पोलिसांनी दोन तीन अंगाने घटनेचा तपास सुरु केला आहे. सर्व संदर्भ तपासले जात आहेत. ही हत्या सुपारी किलर कडून घडवून आणली असल्याचा अंदाजही पोलीस अधिक्षकांनी बोलून दाखविला.

Web Title: The coaching class owner shot dead in Latur