शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
4
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
5
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
6
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
7
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
9
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
10
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
11
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
12
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
13
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
15
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
17
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
18
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
19
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
20
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरण शंभर टक्के भरले; पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उजव्या कालव्यातून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

२०१६ मध्ये लातूर शहरांमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतरच्या पावसाळ्यात मांजरा धरण शंभर टक्के भरले. २०१६ पासून सतत ...

२०१६ मध्ये लातूर शहरांमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतरच्या पावसाळ्यात मांजरा धरण शंभर टक्के भरले. २०१६ पासून सतत प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा झाला. परिणामी, शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. यंदाही धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. मांजरा नदीवरील लासरा ते साई, नागझरी पर्यंतचे सर्व बंधारे भरले आहेत. मांजरा नदी वाहती आहे. १६५ किमी अंतरापर्यंत पाणी आहे. नदीपात्रात मुबलक पाणी आणि मांजरा धरण भरल्यामुळे उजनीच्या पाण्याची चर्चा आता थांबली आहे. मांजरा धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. या क्षमतेत धरण भरल्याने उजव्या कालव्यातून विसर्ग करण्यात आला असल्याचे धरणावरील शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी सांगितले.

लातूर शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा....

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाई नंतर लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीपुरवठा झाला असला तरी आठ दिवसआडच पाणी पुरवठा शहराला होतो आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे चार दिवसाआड किंवा सहा दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मागे एकदा चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न मनपाने केला, परंतु तो यशस्वी ठरला नाही. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याच्या कारणामुळे मुबलक पाणीसाठा असूनही लातूरकरांना आठ दिवसाचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे. यामुळेच जिल्ह्यात डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

उजनीच्या पाण्याची चर्चा थांबली.....

लातूर शहरालगतच्या बंधारे आणि मांजरा प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे आठ दिवसांच्या ऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिक करत आहेत. परंतु वितरण व्यवस्था मनपाने मजबूत केली नाही. शिवाय, आता पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे उजनीच्या पाण्याची चर्चाही थांबली आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या अनुषंगाने उजनीच्या पाण्याची चर्चा केली जाते. मात्र नागरीक या चर्चेत पडत नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.