लातूरमध्ये पुन्हा काठावरचे बहुमत टिकविण्यासाठी भाजप सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:24 IST2019-11-22T02:23:50+5:302019-11-22T02:24:01+5:30
भाजपकडे बहुमत असले तरी फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून, खबरदारी घेण्यात आली आहे.

लातूरमध्ये पुन्हा काठावरचे बहुमत टिकविण्यासाठी भाजप सतर्क
लातूर : भाजपकडे बहुमत असले तरी फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून, खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व नगरसेवकांना शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवल्याची चर्चा आहे.
भाजप ३५, काँग्रेस ३३ आणि राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे़ भाजपकडे काठावरचे बहुमत आहे़ पक्षाकडून व्हीप काढला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. भाजपकडून सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, देविदास काळे, डॉ़ दीपाताई गीते, शंकुतला गाडेकर
यांची नावे महापौरपदाच्या चर्चेत आहेत़ पक्षाने उमेदवार निवडीचे सर्व अधिकार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना दिले आहेत़
काँग्रेसकडून स्थायीचे माजी सभापती विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अॅड़ दीपक सूळ, सपना किसवे आदींची नावे चर्चेत आहेत़