भांडणाची कुरापत काढून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:24+5:302021-06-11T04:14:24+5:30

जमीन मोजणीच्या कारणावरून मारहाण लातूर : तुम्ही सामाईक बांधावरील नाली काढू नका, तहसील भरून अगोदर जमीन मोजून घ्या, असे ...

Beating the ugly of the quarrel | भांडणाची कुरापत काढून मारहाण

भांडणाची कुरापत काढून मारहाण

Next

जमीन मोजणीच्या कारणावरून मारहाण

लातूर : तुम्ही सामाईक बांधावरील नाली काढू नका, तहसील भरून अगोदर जमीन मोजून घ्या, असे म्हटल्यावरून फिर्यादीला मारहाण झाल्याची घटना देवणी तालुक्यातील करवंदी येथे घडली. याबाबत आकाश राजेंद्र बावगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप शिवराज बावगे व अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोसई. डप्पडवाड करत आहेत.

निलंगा येथून दुचाकीची चोरी

लातूर : निलंगा न्यायालय परिसरात कंपौंडलगत पार्किंग केलेल्या एमएच २४ एडी १४०४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली. याबाबत रणजित काशीनाथ कदम (रा. सुमठाणा, ता. शिरूर अनंतपाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध निलंगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. नागटिळक करत आहेत.

पैसे घेतल्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : गाडी घेऊन देतो म्हणून ५० हजार रुपये घेतले. सदर पैशांची विचारणा केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून चापटाने मारहाण तसेच दगडाने कपाळावर मारून जखमी केल्याची घटना बीदर रोड उदगीर येथे घडली. याबाबत भगवान पुंडलिक सूर्यवंशी (रा. माळेवाडी, ता. उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप भांगे (रा. एस.टी. कॉलनी, उदगीर) याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. कांबळे करीत आहेत.

दुचाकीची पाठीमागून कारला धडक; गुन्हा दाखल

लातूर : भरधाव वेगातील एमएच २४ एडी १९७० या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने उमा चौक ते गांधी नगर जाणाऱ्या रोडवर (उदगीर) एमएच २४ व्ही ४४१४ या क्रमांकाच्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली. याबाबत माहिती न देता मोटारसायकल तिथेच सोडून दुचाकीस्वार निघून गेला. याबाबत ॲड. दयानंद मनोहर पाटील (रा. नागलगाव, त. उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २४ एडी १९७० या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अहमदपूर येथून दुचाकीची चोरी

लातूर : अहमदपूर येथील गोविंद कलेक्शनसमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ डीई ३०५० या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत गणेश संजीव गुंजारे (रा. ढाळेगाव, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी

लातूर : शहरातील शिवाजी चौकातील एका कॉम्प्लेक्ससमोर पार्किंग केलेल्या एमएच २३ एजी ८३२२ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत हसन रियाज जुबरी (रा. खोरी गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Beating the ugly of the quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.