शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

औसा-लातूर महामार्गावर कार अडवून लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:33 IST

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील सिद्धेश्वर दशरथ जाधव हे लातूरहून सोलापूरला कारने निघाले होते. औसा तालुक्यातील बुधोडा गावानजीक त्यांच्या कारला ...

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील सिद्धेश्वर दशरथ जाधव हे लातूरहून सोलापूरला कारने निघाले होते. औसा तालुक्यातील बुधोडा गावानजीक त्यांच्या कारला दोघांनी अडविले. त्यांच्या हातात काठी, दगड होते; परंतु जाधव यांनी तिथे कार न थांबविता पुढे नेली. मात्र, मागून कारवर या दोघांनी दगडफेक केली. काही अंतरावर कार थांबवून जाधव यांनी या दोघांजवळ येऊन दगडफेक का करता, असे विचारले. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. दरम्यान, जाधव यांनी परवाना असलेल्या स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळी झाडली. यावेळी एक जण पळून गेला, तर एकाला त्यांनी धरून ठेवले. तेवढ्यात दरोडा प्रतिबंधक पथक पेट्रोलिंग करताना तिथे दाखल झाले. या पथकाने एकाला ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो बुधोडा गावातीलच संगमेश्वर व्यंकट कांबळे असल्याचे समजले. त्याचा दुसरा साथीदार लहू हंसराज गायकवाड हाही बुधोड्याचाच निघाला. त्याला पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथून ताब्यात घेतले. घटनास्थळी औसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याबाबत औसा पोलीस ठाण्यात कलम ३९३, ३३६, ३४१, ४३७, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक दिवसाची पोलीस कोठडी

या प्रकरणात पोलिसांनी संगमेश्वर कांबळे याला औसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर दुसरा लहू गायकवाड याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी सांगितले.