लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:58 PM2024-04-06T12:58:11+5:302024-04-06T12:58:27+5:30

सायंकाळच्या वेळेस अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उकाडा वाढला आहे.

At Aurad Shahajani in Latur district, the temperature is at 44 degrees Celsius | लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर

औराद शहाजानी : मागील आठवड्यापासून औराद शहाजानी परिसरात कमाल व किमान तापमानात जोरदार वाढ होत असून, गुरुवारी ४३ अंशांवर असलेले तापमान शुक्रवारी ४४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसूून येत होता.

औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर शुक्रवारी कमाल ४४ तर किमान २७.५ अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. या वर्षीच्या उन्हाळ्यातील हे उच्चांकी तापमान असून, उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय, रसाळ फळांना पसंती देत आहेत. उन्हापासून बचाव होण्यासाठी डोक्याला पांढरा कपडा, छत्री किंवा झाडाची सावली शाेधताना नागरिक दिसून येत आहेत. त्यातच सायंकाळच्या वेळेस अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उकाडा वाढला आहे. शुक्रवारी औराद हवामान केंद्रावर कमाल तापमान ४४ अंश तर किमान २७.५ अंश तापमानाची नोंद झाली असल्याचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.
 

Web Title: At Aurad Shahajani in Latur district, the temperature is at 44 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.