शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याचे होणार वार्षिक मूल्यांकन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 6:02 PM

शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याचे वार्षिक मूल्यांकन करण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे़

ठळक मुद्देया प्रक्रियेमुळे शिक्षकांचे उत्तरदायित्व निश्चित केले जाईल़ मूल्यांकनाचा भर विद्यार्थी आणि गुणवत्ता विकासासाठी

लातूर : वर्गातील उपस्थिती, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळा गुणवत्तेच्या आलेखाचा निकष समोर ठेवून शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याचे वार्षिक मूल्यांकन करण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे़ त्यासंबंधीची सविस्तर योजना २०२२ पर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार करावी, असेही धोरणात म्हटले आहे़ 

या प्रक्रियेमुळे शिक्षकांचे उत्तरदायित्व निश्चित केले जाईल़ ज्यामुळे शिक्षण प्रणालीमधील निष्ठा आणि पारदर्शकता अधिक स्पष्ट होईल़ या प्रक्रियेत शिक्षकांना सामावून घेताना वातावरण भीतीचे राहणार नाही, याची काळजी घ्यायची आहे़ अर्थातच मूल्यांकनाचा भर विद्यार्थी आणि गुणवत्ता विकासासाठी असून तो कारवाईसाठी नाही, हेच धोरणाने अपेक्षित ठेवले आहे़ शिवाय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आपापल्या राज्यात शिक्षकांची स्वायत्तता आणि सशक्तीकरणासाठीही मापदंड निर्माण करतील़ शाळेत नियुक्त झालेल्या नव्या शिक्षकांना सुरुवातीची दोन वर्षे विविध स्तरावर प्रशिक्षण देण्याची योजना आहे़ ज्यामध्ये जुन्या शिक्षकांच्या तुलनेत नव्या शिक्षकांना कार्यभार कमी दिला जावा, असे सुचविण्यात आले आहे़ शिक्षणातील बदलाकडे लक्ष वेधताना शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही भर देण्यात येणार आहे़ तसेच प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका शिक्षण खात्याला वठवावी लागणार आहे़ 

२०२२ पर्यंत शाळा सुविधासंपन्न होतील ? प्रत्येक शाळेत २०२२ पर्यंत उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्याची शिफारस करण्यात आली आहे़ ज्यामध्ये सर्व शाळांमध्ये वीज पुरवठा, संगणक, इंटरनेट, मूलभूत व्यवस्थेमध्ये स्वच्छ परिसर, इमारत, पेयजल सुविधांचा समावेश आहे़ प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेकडो शाळांमधील १३ हजारांवर वर्गखोल्यांची पडझड झाली आहे़ मध्यंतरी बहुतांश जिल्हा परिषद शाळांच्या वीज बिलांचा प्रश्न निर्माण होऊन पुरवठा खंडित करण्यात आला होता़ अशा परिस्थितीत राष्ट्रीय धोरणाने २०२२ पर्यंत सुविधासंपन्न शाळेची केलेली कल्पना प्रत्यक्षात येईल का, हा प्रश्न आहे़ 

नियुक्तीनंतर तीन वर्षे प्रोबेशऩ़़शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर तीन वर्षांचा प्रोबेशन कालावधी ठरविण्यात येणार असून, त्यानंतर गुणवत्तेवर कायम केले जाईल़ सेवेत कायम झाल्यानंतरही सातत्याने मूल्यांकन प्रक्रिया सुरू ठेवण्याची शिफारस नव्या धोरणाने केली आहे़ त्याचबरोबर बुद्धिवान, गुणवंतांना आकर्षित केले जाईल, असे वेतन असावे़ वेतनवाढ आणि पदोन्नती कालबद्ध पद्धतीने व्हावी़ तसेच २०३० पर्यंत सर्व शिक्षकांसाठी चार वर्षीय बी़एड़् अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्याची शिफारसही करण्यात आली आहे़.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रlaturलातूरSchoolशाळा