जिल्ह्यात आणखीन १३ बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:14+5:302021-09-07T04:25:14+5:30

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत सोमवारी ७१६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

Addition of 13 more infected patients in the district | जिल्ह्यात आणखीन १३ बाधित रुग्णांची भर

जिल्ह्यात आणखीन १३ बाधित रुग्णांची भर

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत सोमवारी ७१६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ६९७ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात सहा जण बाधित आढळले आहेत. १४१३ एकूण चाचण्या दोन्ही मिळून करण्यात आल्या. त्यात १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ९६ रुग्ण उपचार घेत आहेत.त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३७७५ दिवसावर गेला आहे. हा लातूर जिल्ह्यासाठी दिलासा असून अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी करोना नियमांचे पालन करावे. नियमित मास्क वापरावा. सुरक्षित अंतर पळावे. वारंवार हात धुवावेत व जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Addition of 13 more infected patients in the district