शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरुन गंगापूर गावाकडे निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, लातूर-औसा महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 23:30 IST

या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, सोमनाथ शिवलिंग ढगे (वय ४५, रा. गंगापूर, ता.जि. लातूर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

लातूर : दुचाकीवरून गावाकडे जात असताना एका तरुणाचा अपघातातमृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास लातूर-औसा महामार्गावरील खाेपेगाव पाटी येथे घडली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, सोमनाथ शिवलिंग ढगे (वय ४५, रा. गंगापूर, ता.जि. लातूर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, सोमनाथ ढगे हे रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून लातूर येथून गंगापूरकडे जात होते. दरम्यान, लातूर-औसा महामार्गावरील खोपेगाव पाटी परिसरात ते आले असता, त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, सोमनाथ हे रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला, शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी लातूर येथील शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. येथील डॉ. दयानंद सोनवणे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत लातुरातील गांधी चौक पोलिस ठाण्यात याची प्राथमिक नाेंद करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाेलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पोलिस हवालदार गुडमेवाड हे अधिक तपास करीत आहेत. सोमनाथ ढगे यांच्या निधनाने गंगापूर गावात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर वाहनचालक पसार...लातूर-औसा महामार्गावर खाेपेगाव पाटी येथे दुचाकीचा अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा पसार झाला. त्या वाहनधारकाचा पोलिस शाेध घेत आहेत. पाेलिसांकडून ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पाहणी केली जात आहे, लवकरच पसार झालेल्या वाहनाचा शाेध लागेल. - अरविंद पवार, पाेलिस निरीक्षक, लातूर

पेट्राेल पंपावर हाेते कामाला...सोमनाथ ढगे हे गंगापूर येथून लातूररला दरराेज ये-जा करीत हाेते. लातूर येथील एका पेट्राेल पंपावर ते काम करत हाेते, अशी माहिती पाेलिसांनी दिली. रविवारी सायंकाळी ते लातूर येथून गंगापूरकडे दुचाकीवरुन जात हाेते. दरम्यान, खाेपेगाव पाटी येथे हा भीषण अपघात झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Young man dies in accident on way to Gangapur.

Web Summary : Somnath Dhage, 45, died in an accident near Khopegaon while riding his bike to Gangapur. He was taken to a hospital in Latur, but died before arrival. Police are investigating, searching for the driver who fled after the accident.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू