दुचाकीवरुन गंगापूर गावाकडे निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, लातूर-औसा महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 23:30 IST2026-02-08T23:29:34+5:302026-02-08T23:30:00+5:30

या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, सोमनाथ शिवलिंग ढगे (वय ४५, रा. गंगापूर, ता.जि. लातूर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Accidental death of a young man who was going towards Gangapur village on a two-wheeler, incident on the Latur-Ausa highway | दुचाकीवरुन गंगापूर गावाकडे निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, लातूर-औसा महामार्गावरील घटना

दुचाकीवरुन गंगापूर गावाकडे निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, लातूर-औसा महामार्गावरील घटना

लातूर : दुचाकीवरून गावाकडे जात असताना एका तरुणाचा अपघातातमृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास लातूर-औसा महामार्गावरील खाेपेगाव पाटी येथे घडली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, सोमनाथ शिवलिंग ढगे (वय ४५, रा. गंगापूर, ता.जि. लातूर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, सोमनाथ ढगे हे रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून लातूर येथून गंगापूरकडे जात होते. दरम्यान, लातूर-औसा महामार्गावरील खोपेगाव पाटी परिसरात ते आले असता, त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, सोमनाथ हे रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला, शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी लातूर येथील शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. येथील डॉ. दयानंद सोनवणे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत लातुरातील गांधी चौक पोलिस ठाण्यात याची प्राथमिक नाेंद करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाेलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पोलिस हवालदार गुडमेवाड हे अधिक तपास करीत आहेत. सोमनाथ ढगे यांच्या निधनाने गंगापूर गावात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर वाहनचालक पसार...
लातूर-औसा महामार्गावर खाेपेगाव पाटी येथे दुचाकीचा अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा पसार झाला. त्या वाहनधारकाचा पोलिस शाेध घेत आहेत. पाेलिसांकडून ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पाहणी केली जात आहे, लवकरच पसार झालेल्या वाहनाचा शाेध लागेल. - अरविंद पवार, पाेलिस निरीक्षक, लातूर

पेट्राेल पंपावर हाेते कामाला...
सोमनाथ ढगे हे गंगापूर येथून लातूररला दरराेज ये-जा करीत हाेते. लातूर येथील एका पेट्राेल पंपावर ते काम करत हाेते, अशी माहिती पाेलिसांनी दिली. रविवारी सायंकाळी ते लातूर येथून गंगापूरकडे दुचाकीवरुन जात हाेते. दरम्यान, खाेपेगाव पाटी येथे हा भीषण अपघात झाला.

Web Title : लातूर: गंगापुर जा रहे युवक की दुर्घटना में मौत।

Web Summary : गंगापुर जा रहे 45 वर्षीय सोमनाथ ढगे की खोपेगांव के पास बाइक दुर्घटना में मौत हो गई। उन्हें लातूर के अस्पताल ले जाया गया, लेकिन पहुंचने से पहले ही उनकी मृत्यु हो गई। पुलिस जांच कर रही है, दुर्घटना के बाद फरार चालक की तलाश जारी है।

Web Title : Latur: Young man dies in accident on way to Gangapur.

Web Summary : Somnath Dhage, 45, died in an accident near Khopegaon while riding his bike to Gangapur. He was taken to a hospital in Latur, but died before arrival. Police are investigating, searching for the driver who fled after the accident.