खडी केंद्रावरून घराकडे निघालेल्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले! बाेरफळ शिवारातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: March 10, 2026 05:22 IST2026-03-10T05:21:33+5:302026-03-10T05:22:13+5:30

समोरून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने नीलेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

A young man walking home from Khadi Kendra was crushed by a speeding vehicle! Incident in Borphal Shivara | खडी केंद्रावरून घराकडे निघालेल्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले! बाेरफळ शिवारातील घटना

खडी केंद्रावरून घराकडे निघालेल्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले! बाेरफळ शिवारातील घटना

औसा (जि. लातूर) : गरिबीच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी दिवसभर खडीकेंद्रावर घाम गाळायचा आणि रात्री आईच्या हातचं जेवण जेवायचं... हा १८ वर्षीय नीलेश दत्तात्रय चिंचोलकर याचा रोजचा दिनक्रम. मात्र, सोमवारी रात्री बोरफळ शिवारात त्याच्यावर काळाने घात घातला. समोरून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने नीलेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात घराचा आधारवड असलेला तरुण जागीच कोसळला अन् उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

पाेलिसांनी सांगितले, कोळेवाडी (ता. औसा) येथील नीलेश हा औशामधील एका खडीकेंद्रावर काम करत होता. नेहमीप्रमाणे काम संपवून तो आपल्या दुचाकीवरून घरी निघाला होता. बोरफळ येथील सर्व्हिस रोडवर तो आपल्या बाजूने जात असताना, चुकीच्या बाजूने येणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडले. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला. नीलेशला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

आईने फाेडला हंबरडा...

घरी परिस्थिती बेताचीच. मात्र, नीलेशच्या कष्टावर आई-वडिलांच्या आशा टिकून होत्या. नीलेश येईल, यासाठी आई-वडील दारात डोळे लावून बसले होते. नीलेशच्या येण्याऐवजी आली ती त्याच्या मृत्यूची बातमी. ‘माझा लेक आता कधीच येणार नाही,’ हे ऐकताच आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांची काळीज चिरून गेला. एका होतकरू मुलाच्या जाण्याने कोळेवाडी गावावर शोककळा पसरली. धडक देणारा चालक वाहनासह पसार झाला. औसा पोलिसांनी पंचनामा केला आहे.

Web Title : खदान से घर लौट रहे युवक को तेज रफ्तार वाहन ने कुचला, मौत

Web Summary : औसा के पास बोरफळ में खदान से काम कर लौट रहे 18 वर्षीय नीलेश की तेज रफ्तार वाहन से टक्कर में मौत हो गई। परिवार का सहारा नीलेश था, जिसके माता-पिता उसका इंतजार कर रहे थे। चालक फरार, गांव में शोक।

Web Title : Young Man Dies in Hit-and-Run After Work at Quarry

Web Summary : An 18-year-old, Nilesh, died in a hit-and-run near Borfal while returning home from work. A speeding vehicle struck his bike, killing him. Nilesh, who supported his family, was awaited by his parents. The driver fled, leaving the village in mourning.