वाढदिवसासाठी गेलेल्या मुलाचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू; लतुरातील लक्ष्मी कॉलनी येथील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: October 13, 2023 05:59 IST2023-10-13T05:56:51+5:302023-10-13T05:59:10+5:30

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

a boy falls from third floor to death; Incident at Lakshmi Colony in Latur | वाढदिवसासाठी गेलेल्या मुलाचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू; लतुरातील लक्ष्मी कॉलनी येथील घटना

वाढदिवसासाठी गेलेल्या मुलाचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू; लतुरातील लक्ष्मी कॉलनी येथील घटना

लातूर : नातेवाईकाकडे वाढदिवसानिमित्त गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा अपार्टमेन्टच्या तिसऱ्या मजल्यावर खेळताना खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी येथे घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलीसांनी सांगीतले, राज ऊर्फ जगदीश महादेव साखरे (वय १६ रा. बीटरगाव ता. रेणापूर) हा लातुरतील लक्ष्मी कॉलनी परिसरातील एका नातेवाईकाकडे वाढदिवसानिमित्त गेला होता. दरमयान, मयत मुलगा राज उर्फ जगदीश हा अन्य एका मुलासोबत अपार्टमेन्टच्या तिसऱ्या मजल्यावर सांयकाळच्या सुमारास खेळत होता. यावेळी तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने जगदीश हा गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी तातडीने लतुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचरादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. 

याबाबत शासकिय रुग्णालयातील डॉ. संगीता टपरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल चौगुले करत आहेत.

Web Title: a boy falls from third floor to death; Incident at Lakshmi Colony in Latur