लातूरात ‘रेकाॅर्ड’वरील ९ सराईत गुन्हेगारांना केले स्थानबद्ध

By राजकुमार जोंधळे | Published: May 6, 2024 07:10 PM2024-05-06T19:10:35+5:302024-05-06T19:11:04+5:30

३५९३ जणांना पाेलिसांनी दाखविला हिसका...

9 criminals on record in Latur have been booked | लातूरात ‘रेकाॅर्ड’वरील ९ सराईत गुन्हेगारांना केले स्थानबद्ध

लातूरात ‘रेकाॅर्ड’वरील ९ सराईत गुन्हेगारांना केले स्थानबद्ध

लातूर : लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या सराईत, अट्टल ९ गुन्हेगारांवर महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए ॲक्ट) कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारत स्थानबद्ध केले आहे. त्यांची राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत रवानगी करण्यात आली आहे.

लाेकसभा निवडणूक काळात गडबड, गाेंधळ हाेऊ नये यासाठी लातूर पाेलिसांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची कुंडली जमा केली असून, त्यांच्यावर विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. सतत गुन्हे करणाऱ्या, सामाजिक शांततेला धाेका निर्माण करणाऱ्या सराईत, अट्टल गुन्हेगारांवर महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए ॲक्ट) कायद्यानुसार कारवाई करून स्थानबद्ध केले आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील हार्सूल कारागृह, लातूर जिल्हा कारागृहासह इतर जिल्ह्यातील कारागृहात थेट रवानगी करण्यात आली आहे.

१३१९ वाँटेड गुन्हेगारांना पाेलिसांनी बजावले वाॅरंट...
लातूर जिल्ह्यातील विविध २३ पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर फरार, वाॅन्टेड असलेल्या एकूण १ हजार ३१९ गुन्हेगारांना पाेलिसांनी वाॅरंट बजावले आहे. त्यांच्यावर कारवाई करून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

गुन्हेगारांच्या टाेळीतील सहा जणांना ‘तडीपार’
निलंगा, जळकाेट आणि चाकूर पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण तीन टाेळ्यांमधील सहा जणांना पाेलिसांनी तडीपार केले आहे. शिवाय, काही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव त्या-त्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. आता या गुन्हेगारांच्या हालचालींवर पाेलिसांची नजर राहणार आहे.

३५९३ सराईत गुन्हेगारांवर विविध कलमांन्वये कारवाई...
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी कलम १०७ अन्वये तब्बल २ हजार ९२९ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. कलम १०९ अन्वये २० जणांवर, कलम ११० अन्वये २४० जणांविराेधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कलम ९३ अन्वये ४०७ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.

Web Title: 9 criminals on record in Latur have been booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.